कोळपेवाडी पंचक्रोशीने जयंतीदिनी केला अहिल्यानगर नावाचा संकल्प
कोळपेवाडी पंचक्रोशीने जयंतीदिनी केला अहिल्यानगर नावाचा संकल्प
कोळपेवाडी पंचक्रोशीने जयंतीदिनी केला अहिल्यानगर नावाचा संकल्प
कोपरगाव विजय कापसे दि ३१ मे २०२४– कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी पंचक्रोशीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९९ वी जयंती मोठ्या दिमाखात साजरी होत असतांनाच “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी संकल्प करु आता नगर नाही अभिमानाने अहिल्यानगर म्हणु” या मथळ्याखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीने दिलेले पोस्टर पंचक्रोशीतील नागरीकांच्या हातात झळकले.
जिल्हा नामांतर कृती समितीचे सक्रीय सदस्य सचिन मिरानामदेव कोळपे यांनी या पोस्टर सोबत फोटो काढुन इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हाट्सअप या समाजमाध्यांमध्ये टाकण्यासाठी आवाहन केले होते त्याला प्रचंड प्रतिसाद लाभला.गतवर्षी जिल्हा नामांतर कृती समितीची स्थापना होऊन यशवंत सेनेचे जिल्हाप्रमुख विजय तमनर , कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथील विठ्ठल बिरदेवाचे पुजारी मोटेदेसाई साहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे माहेरचे वंशज अक्षयराजे शिंदे यांनी जिल्ह्याभरात नामांतर रथयात्रा काढली राज्यभरातील धनगर समाजातील नेते या यात्रेत सहभागी झाले.
त्याची दखल घेऊन आमदार राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार महादेवराव जानकर यांनी विधानपरिषदेत नामांतराचा ठराव मांडला यावर सकारात्मक भूमिका घेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी नगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याची घोषणा केली.गेल्या काही महीन्यापुर्वी महापालिकेने केलेल्या ठरावाला प्रतिसाद देत अधिकृत अध्यादेश देखील काढला मात्र अजुनही दैनंदिन वापरात अहिल्यानगर उल्लेख होताना दिसत नाही यावर लक्ष वेधण्यासाठी अहिल्यादेवी होळकर जयंतीचे औचित्य साधून कोळपेवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी हा उपक्रम राबविला.