आपला जिल्हा

पुढे धोका आहे सावध व्हा -शिवाजी महाराज भालूरकर

पुढे धोका आहे सावध व्हा -शिवाजी महाराज भालूरकर

पुढे धोका आहे सावध व्हा -शिवाजी महाराज भालूरकर

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २ जुन २०२४आपल्या जीवनामध्ये अपघात किंवा धोका होवू नये म्हणून म्हणून सरकार आपल्याला सावध करते. त्याचप्रमाणे साधुसंत ही पुढे धोका आहे,काळाचे भय आहे म्हणून सावधानतेचा इशारा देतात असे प्रतिपादन ह भ प शिवाजी महाराज भालूरकर यांनी केले आहे.

जाहिरात

माणसांच्या जिवाला ज्याठिकाणी धोका आहे तेथे शासनाकडून लालरंगात ‘सावधान ‘ असे बोर्ड लावले जातात.तसेच सर्व संतांनी समाजाला सावध केले आहे. देवालाही सावध केले आहे व ते स्वतःही सावध झाले आहेत .आपल्या काना जवळील एक केस जरी पांढरा झाला तर आपला मृत्यू जवळ येत आहे असे तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून सावध केले आहे.

जाहिरात

कोरोना काळात अनेक माणसे गेली तरीही आपण सावध होत नाही. सावध होऊन भगवंताचे भजन करा. आपले पंजोबा, आजोबा गेले आणि आपल्या डोळ्यासमोर नातूही गेला तरीही आपण सावध होत नाही. जो जन्माला आला तो जाणारच आहे. म्हणून वेळीच सावध होऊन भजनी लागा. काळ आपली वाट पाहत आहे. जेवढे आयुष्य शिल्लक आहे ते सत्कर्मी लावा, भगवंताच्या भजनात घालवा असे महाराजांनी यावेळी सांगितले.

जाहिरात

मृत्यू कसा येईल, कुठे येईल, केव्हा येईल हे कोणीही सांगू शकत नाही. प्रत्येकाच्या मृत्यूची जागा ठरलेली आहे. त्यानुसारच बुद्धी निर्माण होते. यापैकी तुम्ही काहीही थांबू शकत नाही. म्हणून आजच सावध होऊन भगवंताच्या भजनी लागावे असे आवाहन महाराजांनी केले आहे. सदर प्रसंगी ‘काळाने ग्रासिले सावध व्हावे’ हा संत एकनाथ महाराजांचा अभंग निरूपणासाठी घेतला होता.

जाहिरात

यावेळी संगीत साथ वसंत भाकरे,प्रकाश गायकवाड,दत्तात्रय सिनगर आदींनी केली तर श्रीराम कातकडे,रामदास कातकडे,योगिनी कातकडे,बबनराव सांगळे,प्रकाश सांगळे,संजय सांगळे,राजेंद्र सांगळे,सुनील काजळे,गोरख सांगळे,अतुल सांगळे,किसनराव सांगळे आदीसह नागरिक उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे