रेनबो शैक्षणिक संकुलात “विश्वभारती कला, वाणिज्य व विज्ञान जुनिअर कॉलेज” चा शानदार शुभारंभ
रेनबो शैक्षणिक संकुलात “विश्वभारती कला, वाणिज्य व विज्ञान जुनिअर कॉलेज” चा शानदार शुभारंभ
रेनबो शैक्षणिक संकुलात “विश्वभारती कला, वाणिज्य व विज्ञान जुनिअर कॉलेज” चा शानदार शुभारंभ
कोपरगाव विजय कापसे दि २ जुन २०२४– ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे… सत्य शिवाहून सुंदर हे ” या सुप्रसिद्ध गीताची आठवण व्हावी,असे मूर्तिमंत दर्शन म्हणजे आधुनिक शिक्षण महर्षी लहानुभाऊ नागरे अण्णा होय. कोपरगाव तालुक्यात ज्यांना साक्षात शिक्षणाचा महामेरू म्हणून संबोधले जाते, त्या स्व. अण्णांच्या मुशीत तयार झालेले रेनबो शैक्षणिक संकुल हे नाव आज कोपरगाव शहर व तालुक्याच्या पंचक्रोशीत घराघरात पोहोचलेले आहे.
आणि, याच रेनबो इंटरनॅशनल स्कूल, जेऊर कुंभारी या शाळेच्या निसर्गरम्य परिसरात ग्रामीण भागातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांसाठी नव संजीवन ठरू पाहणाऱ्या “विश्वभारती रुरल एज्युकेशन सोसायटी संचलित”, विश्वभारती कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या सेवेत दाखल होत आहे. उच्चशिक्षित प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, प्रदूषण मुक्त परिसर, केंद्रीय संगणकीय सुविधा, सुसज्ज सेमिनार हॉल, प्रशस्त लायब्ररी, स्मार्ट क्लासरूम, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, वायफाय कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, एक्सप्रेस फिडरसह पावर बॅकअप, स्पोर्ट्स सुविधा, विद्यार्थ्यांचा सुरक्षा विमा अशा अनेक सेवा सुविधांनी युक्त हे विश्वभारती कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय स्पर्धेच्या युगात इतर महागड्या शैक्षणिक शुल्काच्या तुलनेत अत्यंत माफक शुल्कात विद्यार्थ्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.
गुणवान व आदर्श विद्यार्थी घडवणारी उपक्रमशील शाळा म्हणून जिल्ह्यात रेनबो इंटरनॅशनल स्कूल या शाळेचा नवलौकिक आहे. दरवर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेत १००% निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवत अव्वल स्थानावर गुण प्राप्त करणारे येथील विद्यार्थी जिल्ह्यात कौतुकास्पद ठरत आहेत.
पारंपरिक शिक्षण पद्धतीला कलाटणी देऊन आपल्या प्रयोगशीलतेतून शिक्षण क्षेत्रात वेगळा आदर्श निर्माण करणाऱ्या रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या या यशाचे श्रेय जाते, ते संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल अग्रवाल, शिक्षणाप्रती व्यापक दृष्टिकोन असलेले संस्थेचे सचिव संजय नागरे , विश्वस्त मनोज अग्रवाल , आनंद दगडे , वनिता नागरे , तसेच, आपल्या आधुनिक व स्व. अण्णांच्या प्रयोगशील विचारांचा जाज्वल्य वारसा लाभलेले कार्यकारी संचालक आकाश नागरे , शैक्षणिक सल्लागार अविनाश शिरसाठ , शैक्षणिक संचालक नानासाहेब दवंगे , उपप्राचार्य निलेश औताडे , प्रशासकीय प्रमुख रवींद्र साबळे यांना तसेच तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग, मेहनती व सेवाभावी शिक्षकेतर कर्मचारी, हुशार व होतकरू विद्यार्थी, जाणकार पालक व हितचिंतक यांचे योगदानही मोलाचे आहे. अखंड ज्ञानसाधना, कडक शिस्त, प्रभावी अध्यापन, उत्कृष्ट निकाल याद्वारे शाळेने आपला वेगळा ठसा निर्माण केलेला आहे. विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून योग्य अंमलबजावणी करणारी शाळा अशी या शाळेची ओळख आहे.
एकाच छताखाली शिक्षणाची नवनवीन दालने उपलब्ध करून विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली व्हावीत, या हेतुने अतिशय प्रशस्त, प्रसन्न व आरोग्यदायी वातावरणात उभारलेले हे विश्वभारती कनिष्ठ महाविद्यालय आगामी काळात युवकांसाठी वरदान ठरणार आहे. तरी बहुसंख्य पालकांनी आपल्या पाल्यांचा विविध शाखांमध्ये प्रवेश घेऊन त्यांचे उज्ज्वल करियर घडवावे व या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आकाश नागरे यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना केलेले आहे.