मोफत सर्व रोग निदान शिबीर संपन्न; अनेक गरजुनी घेतला लाभ
मोफत सर्व रोग निदान शिबीर संपन्न; अनेक गरजुनी घेतला लाभ
कोपरगाव विजय कापसे दि ३ जून २०२४– कोपरगाव जेष्ठ नागरिक सेवा मंच, जेष्ठ महिला समिती, कोपरगाव शहर डॉक्टर्स, ग्रामीण रुग्णालय व साई सेवा भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
त्यावेळी हृदयरोगतज्ज्ञ डॉ.डि.एस मुळे, डॉ.महेंद्र गोंधळी, डॉ.रविंद्र कुलकर्णी, कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या अध्यक्षा सुधाभाभी ठोळे, महिला समितीच्या अध्यक्षा रजनीताई गुजराथी, कार्याध्यक्ष विजय बंब, जेष्ठ नागरिक सेवा मंचचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, नाक कान घसा, डोळे आदि तपासणी करण्यात आली.उपस्थित मान्यवरांचे मंचच्या वतीने सत्कार करण्यात आले.