कोपरगांव शहरातील २५ वर्षीय तरुण बेपत्ता; शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
कोपरगांव शहरातील २५ वर्षीय तरुण बेपत्ता; शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
कोपरगांव शहरातील २५ वर्षीय तरुण बेपत्ता; शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
कोपरगाव विजय कापसे दि ११ जुन २०२४– कोपरगांव शहरातील गांधीनगर येथे राहणारा २५ वर्षीय युवक बेपत्ता झाला असल्याची तक्रार कोपरगांव शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे जी, शुभम सुनील मोरे वय वर्ष २५ रा. गांधीनगर, कोपरगांव(धंदा – टेलरिंग काम) असे हरवलेल्या तरुणाचे नाव असून तो दिनांक ०३/०६/२०२४ रोजी नेहमी प्रमाणे जेवण करून फिरायला जातो असे सांगून गेला परंतु तो अजून अद्याप घरी न परतल्याने , त्याच्या कुटुंबीयांनी कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली आहे. शुभम याची उंची १७० से . मिटर आहे.
त्याचा वर्ण निमगोरा असून, चेहरा गोल, काळी दाढी, अंगामध्ये लाला रंगाचा टी-शर्ट, काळ्या रंगाची फुल पॅन्ट परिधान केलेली आहे.जर असा वर्णन असलेल्या तरुण कुणाला मिळून आला तर कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात कळवावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. आढळून आल्यास खालील नंबरशी संपर्क साधावा.फोन नंबर ०२४२४-२२२३३३ ,सुनील काशिनाथ मोरे मो. ९८२२४७५५८३, ९८५०४०२८९०