शिक्षक मतदार संघाकरीता अहमदनगर जिल्ह्यात सर्वात जास्त मतदान केंद्र नगर व संगमनेर मध्ये
अहमदनगर जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये १७७८१ शिक्षक मतदार
कोपरगाव विजय कापसे दि १४ जुन २०२४– येत्या २६ जून रोजी महाराष्ट्र राज्याच्या वरिष्ठ सभागृहाच्या विधान परिषद नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक होत असून ५ जिल्हे व ५४ तालुक्यांचा विस्तार असलेल्या या निवडणुकीकरिता २१ उमेदवार एकमेकांविरुद्ध निवडणुकीत उतरले असून साधारणपणे ७० हजाराहून अधिकचे शिक्षक मतदार या निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावत २१ उमेदवारांमधून एका उमेदवाराला शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी व ते सोडून घेण्यासाठी आमदार म्हणून राज्याच्या वरिष्ठ सभागृहात पाठवणार आहे.
याच निवडणूकीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये १७७८१ शिक्षक मतदार असून सर्वात जास्त मतदान केंद्र अहमदनगर व संगमनेर तालुक्यात आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शिक्षक मतदारांची संख्या
अकोले-१०२७.
संगमनेर-२४५९.
राहाता-२१५१.
कोपरगाव-२२०७.
श्रीरामपूर-१०२७.
नेवासा-११५२.
शेवगाव-९१७.
पाथर्डी-९४७.
राहुरी-१०१५.
पारनेर-७२९.
अहमदनगर-२२५१.
श्रीगोंदा-९०९.
कर्जत-६४१.
जामखेड-३४९
अहमदनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय मतदार केंद्राची नावे व मतदान केंद्र क्रमांक.
७१) अकोले-तहसीलदार यांचे दालन अकोले.
७२) संगमनेर-मातोश्री रुख्मिणीबाई दामोधर मालपाणी (शारदा शिक्षण मंदिर) पूर्वे कडील उत्तर दक्षिण इमारत दक्षिण कडून खोली नंबर-०२.
७३) संगमनेर-मातोश्री रुख्मिणीबाई दामोधर मालपाणी (शारदा शिक्षण मंदिर) पूर्वे कडील उत्तर दक्षिण इमारत दक्षिण कडून खोली नंबर-०३.
७४-संगमनेर-मातोश्री रुख्मिणीबाई दामोधर मालपाणी (शारदा शिक्षण मंदिर) पूर्वे कडील उत्तर दक्षिण इमारत दक्षिण कडून खोली नंबर-०१.
७५) राहाता-तहसील कार्यालय राहाता पुरवठा शाखा.
७६) राहाता-तहसीलदार यांचे दालन तहसील कार्यालय राहाता.