शुक्राचार्य मंदिरात मेरे साई या मालिकेतील कलाकारांची भेट
शुक्राचार्य मंदिरात मेरे साई या मालिकेतील कलाकारांची भेट
शुक्राचार्य मंदिरात मेरे साई या मालिकेतील कलाकारांची भेट
कोपरगाव विजय कापसे दि १४ जुन २०२४– कोपरगाव शहरातील गोदावरी नदी किनारी वसलेल्या बेट भागातील जिथे कोणतेही शुभ कार्य करण्यास मुहूर्त लागत नाही असे परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरात नुकतीच सोनी टीव्हीवरील प्रसिद्ध “मेरे साई” मालिकेतील कलाकारांनी भेट देत परम सद्गुरु शुक्राचार्य महाराजांची मनोभावे पूजा आरती करत दर्शन घेतले.
याप्रसंगी मेरे साई या मालिकेतील छाया फणसे, नंदिनी दंगल, विकास शर्मा, रिपराज सिंग चौहान, पुनीत राजवीर, कांचन सिंग भुवाळ, प्रीतम जयस्वाल, विकास शेठ अली, हिमांशू शर्मा आदी कलाकारासह आठ वेळा भारतीय राष्ट्रीय आयुर्वेद गुरू पुरस्कार प्राप्त आयुर्वेद गुरू डॉ रामदास आव्हाड हे देखील उपस्थित होते.
या सर्व मेरे साई या मालिकेतील कलाकारांचा शुक्राचार्य मंदिर कमिटीच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड,मंदिर प्रमुख सचिन परदेशी, उपमंदिर प्रमुख प्रसाद पर्हे, सदस्य आदिनाथ ढाकणे, बाळासाहेब लकारे,मंदिर पुजारी जोशी गुरु, भनगे गुरु, मंदिर व्यवस्थापक राजाराम पावरा आदींनी सन्मान करत शुभेच्छा दिल्या.