आपला जिल्हा

आठ वर्षीय तनिष ला दुचाकीने जोराची धडक देत झाला फरार; तनिष गंभीर जखमी कोपरगाव शहरातील घटना

आठ वर्षीय तनिष ला दुचाकीने जोराची धडक देत झाला फरार; तनिष गंभीर जखमी कोपरगाव शहरातील घटना
आठ वर्षीय तनिष ला दुचाकीने जोराची धडक देत झाला फरार; तनिष गंभीर जखमी कोपरगाव शहरातील घटना
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १६ जुन २०२४कोपरगाव शहरातील तनिष तुषार कापसे या आठ वर्षीय बालकास जुना टाकळी रोड काका कोयटे यांच्या बंगल्याच्या जवळच्या कंपाउंड जवळच्या रोडला एका अनोळखी दुचाकी स्वराने जोराची धडक देत तिथून पळून गेल्याची घटना नुकतीच कोपरगाव शहरात घडली असून जखमी तनिष हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.

जाहिरात

सविस्तर वृत्त असे की,आत्मा मालिक गुरुकुल येवला येथे नोकरीस असलेले तुषार रमेश कापसे यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझा ८ वर्षीय तनिष हा मुलगा बुधवार दिनांक १२ जून २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास दुकानात पायी जात असताना त्यास शहरातील जुना टाकळी रोड काका कोयटे यांच्या बंगल्याच्या कंपाउंड जवळ एका अनोळखी होंडा कंपनीच्या युनिकॉन एम एच ३८- ६६८६ या भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी स्वराने जोराची धडक देत तिथून  तो दुचाकी स्वार फरार झाला आहे.

जाहिरात

या अपघातात ८ वर्षे तनिष ला मोठी दुखापत झाली असून अपघात होताच त्याच्या कुटुंबांनी तात्काळ जवळ असलेल्या डॉ. कृष्णा फुलसुंदर यांच्याकडे उपचारासाठी नेले असता त्यांनी सांगितले की मुलाच्या पोटरीचे दोन्ही हाडं तुटले असून तुम्ही  त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा त्यानुसार आम्ही त्याला शहरातील डॉ. योगेश कोठारी यांच्या हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले असल्याच्या माहितीवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये अनोळखी दुचाकी स्वराविरुद्ध  भारतीय दंड संहिता १८६० नुसार २७९,३३७,३३८ तर १९८८ नुसार १८४,१३४ (अ), १३४ (ब) व १७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल दिलीप तिकोणे हे करत आहे.

जाहिरात
माझ्या निष्पाप कोवळ्या जीवाला भरधाव जाणाऱ्या त्या अनोळखी दुचाकी वल्याने जबर धडक देत जखमी केले परंतु त्यांने माणुसकी या नात्याने माझ्या मुलाला तात्काळ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन जाणे अपेक्षित होते परंतु त्याने तसे न करता तेथून पळ काढला आहे त्यामुळे पोलिसांनी सदर दुचाकी स्वरास तत्काळ अटक करून कठोर कारवाई करावी.
 तुषार कापसे (जखमी तनिषचे वडील)
जखमी तनिष

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे