महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांना को – ऑप. ग्रीन सोसायटी बनविण्याचा शुभारंभ समता पासून -अध्यक्ष काका कोयटे
महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांना को – ऑप. ग्रीन सोसायटी बनविण्याचा शुभारंभ समता पासून -अध्यक्ष काका कोयटे
कोपरगाव विजय कापसे दि १८ जुन २०२४: अहमदनगर जिल्ह्यातील समता नागरी सहकारी पतसंस्थेने महाराष्ट्रात सर्व प्रथम सहकार उद्यानाची निर्मिती करून महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळीच्या माध्यमातून सहकाराला को – ऑप. ग्रीन सोसायटी बनविण्याचा शुभारंभ केला असून ॲक्युचा हा उपक्रम महाराष्ट्रातील पर्यावरणाला पूरक असा उपक्रम असल्याचे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सांगितले.
कोपरगाव तालुका सहकारी संस्था सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ, राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक वासुदेव काळे, अहमदनगर जिल्हा स्थैर्य निधी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, नाशिक विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा आदींसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सहकार उद्यानात २०० विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करून सहकार उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले.
थायलंड देशातील चांग मई येथे २३ मे २०२४ रोजी झालेल्या आशियाई पतसंस्थांची शिखर संस्था असलेली एशियन कॉन्फडरेशन ऑफ को – ऑप. क्रेडिट युनियन (ॲक्यु) च्या मुख्य कार्यालयात आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत जगभरातील सहकारी पतसंस्था चळवळीच्या माध्यमातून पतसंस्थांना को – ऑप. ग्रीन सोसायटी करून सहकाराला ‘को – ऑप ग्रीन वर्ल्ड’ करण्याचा ठराव ॲक्युचे खजिनदार ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी मांडला असता, ३६ देशातील पतसंस्थांच्या प्रतिनिधींनी पाठिंबा दर्शविला आहे. ॲक्युच्या या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे.
सहकार उद्यान उद्घाटनप्रसंगी कोपरगाव तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र कोळपे, उपाध्यक्ष ज्ञानदेव मांजरे, मंदावी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आशुतोष पटवर्धन, ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रवीकाका बोरावके, व्यापारी परिसर पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र देशमुख, पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन दादासाहेब औताडे, संचालक रमेश झांबरे, महात्मा फुले पतसंस्थेचे चेअरमन हरिभाऊ गिरमे, सुरज पतसंस्थेचे चेअरमन अशोक कोठारी, कोपरगाव तालुका सहकारी संस्था वरिष्ठ लिपिक राजेंद्र रहाणे आदींसह कोपरगाव तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे पदाधिकारी, तालुक्यातील पतसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.