समता इंटरनॅशनल स्कूलला अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘बेस्ट स्कूल अवॉर्ड’
समता इंटरनॅशनल स्कूलला अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘बेस्ट स्कूल अवॉर्ड’
कोपरगाव विजय कापसे दि २७ नोव्हेंबर २०२४: समता इंटरनॅशनल स्कूलचे आदर्श व्यवस्थापन आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अंमलात आणलेला समता पॅटर्न. या पॅटर्नच्या माध्यमातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी केलेले विद्यार्थी केंद्रित प्रयत्न व सर्वांगीण विकासासाठी समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये तयार केलेल्या आदर्श वातावरणामुळे समताला अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘बेस्ट स्कूल अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले आहे.
मुंबई येथील स्टार एज्युकेशन अँड एक्सलन्स संस्थेच्यावतीने महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक क्षेत्रातील शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांसाठी आयोजित ‘स्टार एज्युकेशन अँड एक्सलन्स एक्सपो २०२४’ अंतर्गत ‘बेस्ट स्कूल अवॉर्ड’ मिळाला आहे. समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती संदीप कोयटे यांना उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. स्वाती संदीप कोयटे यांच्यावतीने स्कूलचे प्राचार्य डॉ.विनोद चंद्र शर्मा यांनी मुंबई येथे झालेल्या भव्य पुरस्कार प्रदान समारंभात हा पुरस्कार स्वीकारला.
समता इंटरनॅशनल स्कूलला अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘ स्कूल अवॉर्ड’ ने सन्मानित केल्यामुळे समता परिवारासाठी हा आनंदाचा व अभिमानाचा क्षण आहे. शैक्षणिक दृष्ट्या कोपरगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या पुरस्कारामुळे आमची सर्व गुण संपन्न विद्यार्थी व त्यांची शैक्षणिक प्रगतीची जबाबदारी अधिक वाढली आहे.
स्वाती कोयटे यांना १० वर्षांपूर्वी शिक्षण क्षेत्राचा कोणताही अनुभव पाठीशी नसताना देखील समता परिवाराचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यात नाव मिळविले आहे. समता इंटरनॅशनल स्कूल कोपरगाव, समता टायनी टॉट्स, कोपरगाव व समता टायनी टॉट्स, शिर्डी, न्यातीज समता इंटरनॅशनल स्कूल श्रीरामपूर, न्यातीज समता टायनी टॉट्स, श्रीरामपूर अशा विविध शिक्षण संस्थांच्या माध्यमातून उत्कृष्ट व्यवस्थापन कसे असते ? याचे उत्तम उदाहरण समता शैक्षणिक संस्था आहेत. समता शैक्षणिक संकुलात २५०० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.