आपला जिल्हा

 भले भाऊ भले चा आवाज शेतकरी मेळाव्यात घुमला;८५ वर्षीय म्हाळू बाबा साबळे यांच्या भलरीने संगमनेरच्या वैभवशाली इतिहासाला उजाळा

 भले भाऊ भले चा आवाज शेतकरी मेळाव्यात घुमला;८५ वर्षीय म्हाळू बाबा साबळे यांच्या भलरीने संगमनेरच्या वैभवशाली इतिहासाला उजाळा
 भले भाऊ भले चा आवाज शेतकरी मेळाव्यात घुमला;८५ वर्षीय म्हाळू बाबा साबळे यांच्या भलरीने संगमनेरच्या वैभवशाली इतिहासाला उजाळा
Sangmner vijay kapse दि २० सप्टेंबर २०२६– मराठीमध्ये बोलीभाषांचा वेगवेगळ्या प्रकार आहे. तसा गीतांचाही वेगवेगळ्या प्रकार आहे. पोवाडे, लावणी, गवळण, भारुड, कोळीगीते, भलेरी गीते, वान जात्यावरची गीते असे अनेक गीतांचे प्रकार आहेत. यापैकी भलरीवानातून दुष्काळी संगमनेर तालुक्याचा माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष व प्रगतीचा वैभवशाली इतिहास 85 वर्षीय म्हाळू बाबा साबळे यांनी हे भले भाऊ भले म्हणत आवाज दिला आणि शेतकरी मेळाव्यात हा भलरीवाण गीताचा आवाज घुमला.

जाहिरात

वडगाव पान येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा व शेतकरी मेळाव्यात हे अनोखे पारंपारिक संस्कृतीचे दर्शन उपस्थित हजारो शेतकऱ्यांना पाहायला मिळाले. काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे,डॉ.जयश्रीताई थोरात, सभापती शंकर पाटील खेमनर, उपसभापती गीताराम गायकवाड व संगमनेर तालुक्यातील सर्व संस्थांचे पदाधिकारी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी समोर शेतकऱ्यांमध्ये 85 वर्षीय म्हाळू बाबा साबळे बसलेले होते. त्यांना पाहताच माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांना आदराने व्यासपीठावर बोलवले आणि शेजारी बसवले. प्रास्ताविक पूर्वी शेतकरी मेळाव्यात म्हाळुबाबांनी एक वाण – गावा अशी डॉ.जयश्रीताई थोरात यांच्यासह सर्वांनी मागणी केली. मग लोकनेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी बाबांना आदरपूर्वक माईक देत त्यांना गीतासाठी विनंती केली यानंतर या 85 वर्षीय तरुणाने हे अत्रभाई म्हणत आवाज दिला. आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

जाहिरात
हे आत्र भाई, भले भाऊ भले, म्हणत त्यांनी वाण गायला

पूर्वीच्या भोळ्या युगाला, एक पातशाह पातशाह उठला,

स्त्रियांवर अत्याचार करायला, हिंदूधर्म लागला संपू पाहायला, चिंता पडली महादेवाला

कैलासी बसून विचार केला, अवतार छत्रपती शिवाजींचा धरला

अ पातशाह बिमोड केला.

तशी घटना घडली कलियुगाला. प्रवारा माई सगळ्यांची आई.

पाणी वाहून जाऊ लागले पूर्वेला

भाऊसाहेब थोरात यांनी हाक दिली जनतेला.

साथ दिली जनतेने आ.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाला, बाळासाहेबांनी पाण्याचा लढा जिंकला.

कारखाना सहकार चालवला एक नंबरला.

तालुक्यातला शेतकरी आनंदी केला.

सगळी ताकद लावली निळवंडे धरणाला.

पाणी आले दोन्ही पाटाला.

याचे सर्व श्रेय माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना
असा संगमनेर तालुक्याचा दुष्काळी ते प्रगतशील तालुका आलेख दर्शवणारा सहकार शिक्षण समृद्धी ग्रामीण विकास संगमनेर शहराचा विकास असा सात मिनिटांचा भलरी वान त्यांनी गायला.

तालासुरात 85 वर्षी आजोबांचे हे गीत ऐकून प्रत्येक वाक्यानंतर टाळ्यांचा कडकडाट होत होता तर त्यांचे पुतणी कारभारी साबळे यांनी भले भाऊ भले म्हणत बाबांना साथ दिली.

यानंतर माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, जुनी माणसं ही आपली आदर्श आहेत या लोकांनी संघर्ष केला आहे. आपल्या तालुक्याला संघर्षाचा मोठा इतिहास आहे. संघर्षातून तालुक्यात समृद्धी निर्माण झाली आहे. मात्र आपले पाणी पळवले जात आहे. आपल्याला पुन्हा संघर्ष करावा लागणार आहे. समृद्ध इतिहास जपताना पुढच्या पिढीने फक्त मोबाईलच्या आहारी न जाता तालुक्याच्या भविष्याच्या दृष्टीने संघर्षासाठी तयार राहिले पाहिजे असे आवाहन केले.

यावेळी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते 85 वर्षीय म्हाळू बाबा साबळे यांचा गौरव करण्यात आला. हा क्षण प्रत्येकासाठी संस्मरणीय ठरला. शेतकरी मेळाव्यात गायलेल्या या भलरी गीत वाणांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला असून दिवसभर सोशल मीडियावर रील्स पाहायला मिळत होत्या.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे