वटपौर्णिमेनिमित्त एकल महिलांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केली वटवृक्षाच्या रोपांची लागवड
वटपौर्णिमेनिमित्त एकल महिलांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केली वटवृक्षाच्या रोपांची लागवड
मोठया जल्लोषात वटपौर्णिमा सर्वत्र साजरी
कोपरगाव विजय कापसे दि २२ जुन २०२४– वटपोर्णिमा हा सौभाग्यवतींचा नटण्या मुरडण्याचा सण. अगदी सकाळपासूनच सर्व तयारी सुरू होते पण घरात जर एखादी पती गमावलेली महिला असेल तर तिच्या भावनांचा तिच्या मनाचा विचार घरातला कोणीही करत नाही. विधवा होणं हा तिचा दोष नाही पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला अंत आहे या उक्तीनुसार एक ना एक दिवस प्रत्येक जण जाणारच आहे. तरीही पती जाणं त्याच पूर्ण खापर महिलांवर फोडलं जाते विधवा म्हणून समाजात अतिशय हीन वागणूक तिला दिली जाते. विधवा म्हणून तिला कुठलाच अधिकार नाही .सावित्री सत्यवानाच्या भाकडकथांना फाटा देत वडाच्या झाडाच्या पूजेला फाटा देत आज सावित्रीबाई फुले यांचे प्रतिष्ठान तर्फे वटवृक्षाची लागवड कोरोना एकल महिलांनी अगदी सजून धजून येऊन केली.
प्रतिष्ठानचे अध्यक्षा संगीता मालकर म्हणाल्या की पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून जास्तीत जास्त ऑक्सिजनची निर्मिती व जमिनीखाली गारवार राहण्यासाठी, वटवृक्षाच्या दाट सावली खाली प्रत्येकाने विसावा घ्यावा हे सर्व दृष्टिकोन समोर ठेवून प्रतिष्ठान तर्फे वटवृक्षाची लागवड करण्यात आली. झाडाच्या पूजेपेक्षाही हे झाड वाढवणे त्याची काळजी घेणं फार महत्वाचा आहे. वटवृक्ष वाढवण्याची जबाबदारी देखील महिलांवर देण्यात आली. याप्रसंगी माजी नगरसेविका वर्षाताई गंगुले स्वातीमुळे नंदिनी पाटील योगिता देवडे मीरा पवार अर्चना जैन जया कनगारे स्मिता पोळ देशमुख ताई आधी महिला उपस्थित होत्या सदरचा उपक्रम श्रीमान गोकुळचंदजी प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता.