एकविराच्या योग शिबिरात २२०० नागरिकांचा सहभाग तर झुम्बा डान्स मध्येही सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग
आनंदी व निरोगी जीवनासाठी योगा महत्त्वाचा – डॉ.जयश्रीताई थोरात
संगमनेर प्रतिनिधी दि २२ जुन २०२४– स्पर्धेच्या आणि धावपळीच्या जीवनात प्रत्येक जण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो.या तणामुक्ती जीवनातून आनंदी व उत्साही जीवनासाठी योगा महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले असून योगाच्या या पाच दिवशीय शिबिर व झुंबा डान्सला संगमनेर मधील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून यामध्ये 2200 नागरिकांनी सहभाग घेतला.
एकविरा फाउंडेशन व इन्फिनिटी योगा स्टुडिओ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवशी योग शिबिराचा समारोप मालपाणी लॉन्स येथे झाला यावेळी ते बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रशिक्षक मनीषा वामन ,रितेश सोनवणे, अनिल शिंदे, श्रीराम कुऱ्हे, डॉ एम. ए व्यंकटेश, प्रा विवेक धुमाळ, निखिल पापडेजा, कमलेश उनवणे, हर्षल राहणे, आदींसह एकविराच्या सदस्य उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा एक परिवार आहे .या तालुक्यातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्यासाठी एकविराच्या वतीने सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहे. शहरातील व तालुक्यातील महिलांकरता योग दिनाच्या निमित्ताने पाच दिवशीय योग शिबिर संपन्न झाले .यामध्ये तरुणी व महिलांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद राहिला असल्याचेही त्या म्हणाल्या.
तर प्रशिक्षक मनीषा राऊत म्हणाल्या की, कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना महिला जास्त तणावात राहत असून या तणावातून मुक्ती करता महिलांनी योगास प्राधान्य द्यावे असे आवाहन केले. मन व शरीराचा एकत्र व्यायाम म्हणजे योग असून योगामुळे जीवनामध्ये उत्साह व ऊर्जा निर्माण होत असतो. निरोगी जीवनासाठी योगा अत्यंत महत्त्वाचा असल्याने प्रत्येकाने दररोज योगा करावा असे आवाहन त्यांनी केले.योगासह दररोज झुम्बा डान्स झाला. यामध्ये 2200 नागरिकांनी सहभाग घेतला.