एस. एस. जी. एम. महाविद्यालयात वृक्षारोपणाने वटपौर्णिमा साजरी
एस. एस. जी. एम. महाविद्यालयात वृक्षारोपणाने वटपौर्णिमा साजरी
एस. एस. जी. एम. महाविद्यालयात वृक्षारोपणाने वटपौर्णिमा साजरी
कोपरगाव विजय कापसे दि २२ जुन २०२४– रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे वटपौर्णिमा हा सण एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. ‘वटवृक्षाला’ भारतीय संस्कृतीत अनेक दृष्ट्या महत्त्व आहे. ‘वटपौर्णिमा’ हा सण याच झाडाशी संबंधित आहे. झाडे पृथ्वीच्या वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड आणि इतर प्रदूषकांची पातळी कमी करतात. झाडे सर्वांना ताजी हवी हवा देतात. याच पार्श्वभूमीवर महाविद्यालयात वटपौर्णिमेचे निमित्त साधून महिला प्राध्यापकांनी वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी केली.
यावेळी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. उज्ज्वला भोर उपस्थित होत्या. यावेळी डॉ. भोर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “पावसाळा चालू आहे. झाडे लावण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. आपण लावलेले प्रत्येक झाड समाजाचे तारणहार बनेल, म्हणून झाडे लावणे ही आपली जबाबदारी आहे”. यावेळी महाविद्यालयातील सीनियर आणि ज्युनियर विभागातील सर्व महिला प्राध्यापक व विद्यार्थिनींसह अनेक प्राध्यापक, सेवक उपस्थित होते. महाविद्यालयाच्या परिसरात वटपौर्णिमेचे निमित्त साधून सर्वांनी वृक्षारोपण केले. महाविद्यालयात हा एक सर्वोत्तम उपक्रम राबवला गेला .
यावेळी विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. बाबासाहेब वर्पे, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. बाबासाहेब शेंडगे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, वनस्पती शास्त्र विभागातील प्रा.एच.टी. मते, कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी यांनी वृक्षारोपणासाठी सहकार्य केले.