एक रुपयात पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक; अंतिम मुदत १५ जुलै २०२४
एक रुपयात पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक; अंतिम मुदत १५ जुलै २०२४
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि २४ जुन २०२४– –निसर्गाच्या लहरीपणाच्या अतिवृष्टी, वादळ,पूर, पावसाचा खंड, पीक काढणी पश्चात नुकसान आदि नैसर्गिक संकटामुळे अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करत शेतात उभे केलेल्या पिकांचा हाता तोंडाशी आलेला घास हातातून निसटून जातो यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते.
जाहिरात
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील झालेल्या आर्थिक नुकसानी पोटी त्यांना काही अंशी का होईना आर्थिक भरपाई मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पिकांना विमा संरक्षण मिळावे म्हणून अवघ्या १ रुपयात प्रति हेक्टरी सर्वसमावेशक प्रधानमंत्री पीक विमा योजना मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही सुरूच ठेवली असून शेतकऱ्यांनी जवळच्या शासकीय बँकेत, सीएससी केंद्रात, आपले सरकार केंद्रात अथवा www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर आपल्या खरीप हंगामातील पिकांचे आवश्यक ती कागदपत्रे विमा संरक्षण करून घ्यावे. तसेच याविषयी अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय तसेच कोपरगाव तालुका विमा प्रतिनिधी वैभव वहाडणे ९१७५६९२७६० व अहमदनगर जिल्हा विमा प्रतिनिधी पंकज रोहोम ९९२१९६१५५२ यांच्या सोबत संपर्क साधावा. पिक विमा भरण्याची अंतिम मुदत १५ जुलै २०२४ असून तोपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी १ रुपयात पिक विमा योजनेचा फॉर्म भरून लाभ घ्यावा.जाहिरात
आपल्या पिकांना मिळणार प्रति हेक्टरी १ रुपयात विमा संरक्षण मदत
बाजरी-३३९१३ रुपये.
भुईमूग-३८००० रुपये.
सोयाबीन-५७२६१ रुपये.
तूर- ३६८०२ रुपये.
कापूस-५९९८३ रुपये.
मका-३५५९८ रुपये.
कांदा- ८०००० रुपये.
मनोज सोनवणे
कोपरगाव तालुका कृषी अधिकारी.
विमा भरण्याची मुदत वाढवावी
राज्यातील बहुतांश भागात अद्याप पाऊस पडला नसल्याने अनेक ठिकाणच्या पेरण्या बाकी असून शेतकरी डोळ्यात जिव आणून पावसाची वाट पाहत आहे. त्यामुळे १५ जुलै नंतर शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकांना विमा संरक्षण मिळू न शकल्याने ते शेतकरी या योजनेपासून वंचित राहू शकतात या बाबीचा विचार करत शासनाने पीक विमा भरण्याची मुदत किमान ३० जुलै पर्यंत करावी.