संगमनेर

अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसीच्या वि‌द्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी साठी निवड

अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसीच्या वि‌द्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी साठी निवड
अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसीच्या वि‌द्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी साठी निवड
जाहिरात

संगमनेर प्रतिनिधी दि २४ जुन २०२४–  अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी यंदाही उत्तम कामगिरी करत तब्बल २२ विद्यार्थ्यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी साठीचे स्थान निश्चित केले. यामध्ये  टाटा कॉन्स्लटिंग सर्विसेस (TCS), कॉग्निझंट, सिपला, मॅकलॉइड्स, लुपिन इ. औषधनिर्माण क्षेत्रातील नामाकिंत कंपनीचा समावेश असल्याची माहिती महाविद्यालायचे प्रा.डॉ. एम. जे. चव्हाण यांनी दिली.

जाहिरात
मॅकलॉईड्स फार्मा कंपनीमध्ये एम. फार्मसीच्या ऋषीकेश आव्हाड, तेजस परदेशी, यश वालझाडे, अनिकेत गायकवाड आणि आकाश शिंगोटे तर कोमल दशपुते, प्रियांका भोर यांची कॉग्निझंट मध्ये निवड झाली आहे. बी. फार्मसी मधुन धनोजा रोडे, रुचिता बोरसे यांची सिपला लिमिटेड तर अजय नागरे, निकिता लंबे आणि अपेक्षा चव्हाणके यांची टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस आणि अदिती आवारे यांची मेट्रॉनिक या कंपनीमध्ये निवड झाली आहे. सुधीर वाकचौरे, पवन कोकणे, अभिजीत हारदे, साक्षी गोसावी, आसावरी काळे ह्या बी. फार्मसीच्या विद्यार्थिनींची आय के एस हेल्थ या कंपनीमध्ये निवड झाली असून, त्याच कंपनीनीत एम. फार्मसीच्या श्रद्धा हासे, ऋतिका वाकचौरे यांची निवड झाली आहे. टेककेअर मेडिकल सव्हिसेस या कंपनीमध्ये बी. फार्मसीच्या वैष्णवी डिके तर लुपिन लिमिटेड यामध्ये अभिमन्यू जोंधळे यांची निवड झाली आहे.

जाहिरात

अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसीने औषधनिर्माणक्षेत्रातील तंत्रज्ञानातील गरजा ओळखून विविध औषधनिर्माण कंपन्या व संस्थांसोबत ट्रैनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने १२ सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आले आहेत. अष्टपैलू विद्यार्थी घडवणे आणि त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय कंपनी मध्ये आपल्या कॉलेजचा विद्यार्थी कसा जाऊ शकेल, याकडे महाविद्यालयाचा नेहमीच कल असतो. प्लेसमेंट समन्वयक प्रा. डॉ. एस. डी. गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष परिश्रम घेतले.

जाहिरात

संस्थेचे अध्यक्ष तसेच राज्याचे माजी महसूलमंत्री मा.आ.बाळासाहेब थोरात व संस्थेचे विश्वस्त माजी आ.डॉ.सुधीर तांबे, संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख, इंद्रजीत थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, अकॅडेमिक डायरेक्टर जे.बी.गुरव यांनी सर्व यशस्वी वि‌द्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. महावि‌द्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.जे.चव्हाण तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी वि‌द्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अमृतवाहिनी फार्मसी कॉलेज

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे