आपला जिल्हा

बांबू लागवड योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे-भाऊसाहेब वाघ

बांबू लागवड योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे-भाऊसाहेब वाघ
गुगल लिंक
https://intranet.mahaforest.gov.in/forestportal/index.php?option=bambooapp&AntiFixation=ac664ce45fd0b22fbdd5d90994cdeb9a
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २७ जुन २०२४महाराष्ट्र शासनाने दि २८ फेब्रुवारी २०२४ च्या शासन निर्णयान्वये ,जुनी अटल बांबू समृद्धी योजना रद्द करून” नवीन अटल बांबू समृद्धी योजना “मंजूर केली आहे. त्यानुसार महाराष्ट्र बांबू विकास मंडळ कडून,” अटल बांबू समृद्धी योजना “अंतर्गत चालू वर्षी (२०२४ चा पावसाळा )बांबू लागवड योजनेसाठी ,ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची गुगल फॉर्म लिंक यासोबत देण्यात येत आहे. तरी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी  अर्ज ऑनलाइन पद्धतीने तात्काळ सादर करावा असे आवाहन कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील नारंदी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे भाऊसाहेब  वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

जाहिरात

या पत्रकात वाघ यांनी म्हटले आहे कु, लाभार्थ्यांची निवड करताना शेतकरी उत्पादक संस्था/ कंपनी, बांबू शेतकऱ्यांचा समूह, नोंदणीकृत संस्था इ.यातील सभासदांनी एकत्रित अर्ज केल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल, तदनंतर खाजगी शेतकऱ्याकडून एक एकट्या शेतकऱ्यांच्या प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाईल. ऑनलाइन अर्ज सादर करताना अर्जासोबत १)आधार कार्ड २) नवीन सातबारा उतारा ३) बँक पासबुकचे पहिल्या पानाची झेरॉक्स किंवा कॅन्सल केलेला चेक आदी कागदपत्रे अपलोड करणे अत्यावश्यक आहेत .

जाहिरात

सदर योजनेअंतर्गत “टिशू कल्चर बांबू रोपे “पुरवठा व त्यांच्या देखभालीकरिता प्रत्येक शेतकऱ्याला ५०% रक्कम एकूण रु.१७५/- अनुदान म्हणून तीन वर्षात देण्यात येईल.सदर अनुदानाची विभागणी प्रथम वर्षात रु.९० /- द्वितीय वर्षात रु. ५०/-  व तृतीय वर्षात रु.३५/- प्रतिरोप याप्रमाणे देण्यात येईल.  पुरवठा करण्यात आलेल्या रोपांची रक्कम ,अनुदानाच्या प्रथम वर्षीय हप्त्यातून समायोजित करण्यात येईल .सदर योजनेअंतर्गत एका शेतकऱ्याला २ हेक्टर क्षेत्राकरिता ६०० रोपे प्रति हेक्टर ,याप्रमाणे एकूण १२०० बांबू रोपे (५मी.×४मी.) अंतरावर लागवड व देखभाली करिता अनुदान मूल्याकनानंतर वर्षाच्या शेवटी देण्यात येईल. ऑनलाइन अर्ज करताना तिथे नमूद केलेल्या सूचना, अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात. ऑनलाइन अर्ज भरताना आपल्या शेतकरी उत्पादक संस्था/ कंपनी ,बांबू शेतकऱ्यांचा समूह ,नोंदणीकृत संस्था ,इ. यांचे नांव सुरुवातीलाच ऑनलाइन अर्जात “रेफर्ड बाय “या   ठिकाणी स्पष्टपणे नमूद करावे.

जाहिरात

 लागवडीसाठी कोणती बांबू प्रजाती निवडायची ,याबाबत शेतकऱ्यांनी ,तज्ञ जाणकाराकडून माहिती घेऊन ,स्वतः योग्य पद्धतीने प्रजातींची निवड करून, प्रजातीनिहाय संख्या ऑनलाईन अर्जात नमूद करावी  शेतकरी उत्पादक संस्था/ कंपनी ,बांबू शेतकऱ्यांचा समूह, नोंदणीकृत संस्था यांचे  सभासदांनी ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर ,अशा शेतकऱ्यांची यादी सविस्तर तपशिलासह ,महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडे सदर संस्थेने लिखित स्वरूपात कळवणे अभिप्रेत आहे.अर्जदारांच्या कागदपत्रे तपासणीनंतर ,चालू वर्षी पावसाळ्यात, महाराष्ट्र बांबू विकास मंडळ कडून ,टिशू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा करण्यात येईल ,कृपया याची नोंद घ्यावी तसेच या संबंधी अधिक माहितीसाठी  भास्कर पवार विभागीय वन अधिकारी (से. नि.) तथा समन्वयक, नाशिक वनवृत्त महाराष्ट्र बांबू विकास मंडळ यांच्या सोबत संपर्क साधावा असे आवाहन वाघ यांनी केले आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे