लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयात राजश्री शाहू महाराज जयंती व जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन साजरा
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयात राजश्री शाहू महाराज जयंती व जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन साजरा
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयात राजश्री शाहू महाराज जयंती व जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन साजरा
अहमदनगर प्रतिनिधी दि २७ जुन २०२४– अहमदनगर शहरातील रयत शिक्षण संस्थेचे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयात लोकराजा राजश्री शाहू महाराज यांची जयंती व जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छायाताई काकडे यांच्या शुभहस्ते राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक प्रदीप पालवे राजश्री यांनी शाहू महाराज यांच्या जीवन कार्याविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती देऊन थोर विचारवंतांचे जीवन चरित्र वाचण्याचे आवाहन केले. तर अमली पदार्थाच्या सेवनामुळे मानवी आरोग्यावर मोठे घातक परिणाम होत असतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी अमली पदार्था पासून नेहमी दूर रहावे तसेच आपल्या घरातील व परिसरातील लोकांचे याबाबत प्रबोधन करत यांचा मानवी आरोग्यावर किती वाईट परिणाम होतो हे त्यांना पटवून देत त्यांना देखील यापासून दूर राहण्याचा आग्रह करावा सल्ला शालेय शिक्षक पालवे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, पालक, विद्यार्थी वाहतूक करणारे वाहन चालक यांनी अमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा करत अमली पदार्थ सेवनापासून दुर राहू अशी शपथ घेतली.
याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छायाताई काकडे, ज्येष्ठ शिक्षक महादेव भद्रे ,आरोग्य समिती प्रमुख अमित धामणे , मीनाक्षी खोडदे ,उर्मिला साळुंखे, सुजाता दोमल तसेच प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.