संगमनेर
अमृतवाहिनी इंजिनिअरिंग मधील आयटी विभागातील ४० विद्यार्थ्यांची थेट नोकरीसाठी निवड
अमृतवाहिनी इंजिनिअरिंग मधील आयटी विभागातील ४० विद्यार्थ्यांची थेट नोकरीसाठी निवड
संगमनेर प्रतिनिधी दि २७ जुन २०२४– सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उत्कृष्ट मानांकनासह देशातील ग्रामीण भागातील उत्कृष्ट महाविद्यालय ठरलेल्या व नेक चा ए प्लस दर्जा असलेल्या अमृतवाहिनी इंजीनियरिंग कॉलेजमधील आयटी विभागातील ४० विद्यार्थ्यांची साडेआठ लाखाच्या पॅकेजवर नोकरीसाठी थेट निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. एम ए व्यंकटेश यांनी दिली आहे.