आपला जिल्हा

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; उद्या ३० टेबलवर होणार मतमोजणी

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; उद्या ३० टेबलवर होणार मतमोजणी

अधिकारी व कर्मचारी यांचे मतमोजणी प्रशिक्षण पूर्ण

नाशिक प्रतिनिधी दि ३० जून २०२४ (विमाका वृत्तसेवा): नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी दि. १जुलै, २०२४ रोजी केंद्रीय वखार महामंडळ, गोदाम अंबड येथे होणार आहे. मतमोजणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर अधिकारी व कर्मचारी यांचे मतमोजणी प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.

जाहिरात

नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण ६४ हजार ८४८ मतदारांनी मतदान केले. याची मतमोजणीच्या अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळ, गोदामात ३० टेबलवर होणार आहे. मतमोजणी केंद्राची पाहणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गडाम यांनी केली. तसेच मतमोजणी संदर्भातील आवश्यक ते सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना केल्या.

जाहिरात

यावेळी जिल्हाधिकारी नाशिक जलज शर्मा, पोलीस आयुक्त नाशिक संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी अहमदनगर सिद्धराम सालीमठ, जिल्हाधिकारी जळगांव, आयुष प्रसाद जिल्हाधिकारी धुळे अभिनव गोयल, जिल्हाधिकारी नंदुरबार मनीषा खत्री, अपर आयुक्त तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निलेश सागर व विभागातील इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

अशी करण्यात आली आहे तयारी..

मतमोजणीच्या अनुषंगाने मतमोजणी कक्ष, निरीक्षक कक्ष, सुरक्षा कक्ष, माध्यम कक्ष, केंद्रावरील टेबल रचना, प्रकाश व्यवस्था, विद्युत पुरवठा, आरओ, एआरओ बैठक व्यवस्था, उमेदवारांसाठी बैठक व्यवस्था तसेच आवश्यक त्या कक्षांची उभारणी करण्यात आली आहे. मतमोजणी कक्षात मोबाईल घेऊन जाता येणार नाही. मतमोजणीसाठी नेमलेल्या अधिकारी-कर्मचारी यांनी आपले ओळखपत्र सोबत ठेवत जबाबदारी देण्यात आलेल्या ठिकाणीच थांबावे. तसेच उमेदवारांनी नेमलेल्या मतमोजणी प्रतिनिधी यांनी देखील नियुक्ती दिलेल्या ठिकाणीच थांबावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

संकल्पित चित्र

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे