आपला जिल्हा
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा- तालुकाप्रमुख कपिले
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा- तालुकाप्रमुख कपिले
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा- तालुकाप्रमुख कपिले
कोपरगाव विजय कापसे दि ३ जुलै २०२४– मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कोपरगाव तालुकाप्रमुख ज्ञानेश वसंतराव कपिले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
या पत्रकात कपिले यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा आजपर्यंत राज्यातील हजारो गरजू रुग्णांनी लाभ घेतला असून या निधीचा कॉकलीयर इम्प्लेंट, हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, किडनी प्रत्यारोपण, फुप्पूस प्रत्यारोपण, बोन मॅरो प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, अपघात शस्त्रक्रिया, लहान बालकांच्या शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायलिसिस, अपघात, कर्करोग (केमोथेरपी/रेडिएशन) नवजातशिशुचे आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, बर्न रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण या आजाराने बाधित असलेले गरजू रुग्ण लाभ घेऊ शकतात अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कोपरगाव तालुकाप्रमुख ज्ञानेश कपिले यांनी देत अधिक माहितीसाठी ९०६७२३१६२७ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन कपिले यांनी केले आहे.