मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचे कोपरगाव शहरातील महिलांनी केले जल्लोषात स्वागत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचे कोपरगाव शहरातील महिलांनी केले जल्लोषात स्वागत
मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचे कोपरगाव शहरातील महिलांनी केले जल्लोषात स्वागत.
कोपरगाव विजय कापसे दि ३ जुलै २०२४: महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळल्यापासून एकनाथजी शिंदे साहेब यांनी अनेक योजना महिलांच्या कल्याणासाठी या राज्यात सुरू केल्या आहेत. महिला समस्यांची जाण असल्यामुळेच महिला सुरक्षित तर घर सुरक्षित, मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान, लेक लाडकी योजना, अन्नपूर्णा योजना ,महिलांसाठी पिंक रिक्षा, मुलींच्या विविध शिक्षणासाठी फी माफी, लाखो महिलांना लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट अशा अनेक कल्याणकारी योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात यापूर्वीच सुरू केलेल्या आहेत.
यावर्षी २०२४ च्या अर्थसंकल्पातही महिलांच्या सशक्तिकरणासाठी त्यांनी भरीव आर्थिक तरतूद केली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची त्यांनी घोषणा करून व त्वरित अंमलबजावणीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे कोपरगाव शहरातील महिलांनी उत्स्फूर्त स्वागत केले आहे.
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा रुपये दीड हजार लाभ मिळणार आहे . या योजनेचा राज्यातील दोन कोटी पेक्षा अधिक महिलांना आर्थिक लाभ मिळणार आहे. आपल्या अहिल्या नगर जिल्ह्यातील पात्र महिलांनी या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख विमल पुंडे यांनी जिल्ह्यातील महिलांना केले आहे. महाराष्ट्रातील महिलांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने क्रांती घडविणारी ही योजना आहे. या योजनेचे स्वागत तसेच मुख्यमंत्री साहेबांचे अभिनंदन करण्यासाठी जिल्ह्यातून शेकडो महिलांच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांना राख्या पाठवण्यात येत आहे. अशी माहिती विमलताई पुंडे यांनी दिली आहे.