छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसस्थानकासमोरच होणार; मुख्यमंत्र्यांची अंतिम मंजुरी, आ. थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश
छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसस्थानकासमोरच होणार; मुख्यमंत्र्यांची अंतिम मंजुरी, आ. थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश
जाहिरात
संगमनेर प्रतिनिधी दि ४ जुलै २०२४–काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका व शहर हे विकासाचे मॉडेल ठरले असून या शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या हायटेक बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारणीस मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडून अंतिम मंजुरी मिळाली असल्याची माहिती विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे.
जाहिरात
या अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीबाबत अधिक माहिती देताना आमदार तांबे म्हणाले की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा संगमनेर मधील बस स्थानकासमोर व्हावा ही तमाम संगमनेरकरांची मागणी होती. यानुसार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेने 2018 एसटी महामंडळाकडे अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्यासाठी जागा मिळावी याकरता प्रस्ताव देवून मागणी केली होती. याकरता नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांनी मोठा पाठपुरावाही केला. 2019 नंतर सातत्याने आमदार बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला.
जाहिरात
या सततच्या पाठपुराव्याला मोठे यश आले असून राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी आज या जागा मागणीच्या प्रस्तावास व अश्वारूढ पुतळ्यासाठी अंतिम मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच संगमनेरच्या हायटेक बसस्थानकासमोरच सुशोभीकरणासह भव्य असा अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होणार आहे. त्याचबरोबर सध्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेवर मोठे शहीद स्मारक होणार असून या ठिकाणी 100 फुटी तिरंगा झेंडा उभारण्याचे नियोजित असल्याचेही आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले आहे
जाहिरात
संगमनेरकरांकडून आभारछत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जागेसाठी अंतिम मंजुरी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व पाठपुरावा केल्याबद्दल विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व युवा आमदार सत्यजित तांबे यांचे तमाम संगमनेरकरांनी अभिनंदन केले आहे
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचाही पूर्णाकृती पुतळा होणार
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सध्या असलेल्या पुतळ्या जवळ अद्यावत सुशोभीकरणासह भव्य पूर्णाकृती पुतळा लवकरच उभारला जाणार असल्याचेही नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले आहे