आपला जिल्हा

ब्राम्हणगाव शाळेतील विद्यार्थ्यांना पावसाळी आजारांविषयी मार्गदर्शन शिबिर संपन्न

ब्राम्हणगाव शाळेतील विद्यार्थ्यांना पावसाळी आजारांविषयी मार्गदर्शन शिबिर संपन्न
ब्राम्हणगाव शाळेतील विद्यार्थ्यांना पावसाळी आजारांविषयी मार्गदर्शन शिबिर संपन्न
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ६ जुलै २०२४- सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून या दिवसात अनेक आजार आपले डोके वर काढत असतात या आजाराच्या पार्श्वभूमीवर गुरुवार ४ जुलै रोजी कोपरगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ विकास घोलप , प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी व ब्राम्हणगाव चे मेडिकल ऑफिसर डॉ.अनिकेत खोत ,डॉ.असेफा पठाण  यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना पावसाळ्यात वाढणारे जलजन्य आजार अतिसार ,कॉलरा ,टायफॉईड तसेच कीटक जन्य आजार मलेरिया ,डेंगू , चिकनगुणिया या आजाराबाबत सविस्तर आरोग्य विषयक माहिती, प्रात्यक्षिक व घ्यावयाची काळजी या संबंधी विद्यार्थ्यांना आयुष्मान आरोग्य मंदिर ब्राम्हणगावचे समुदाय आरोग्य अधिकारी संकेत पोटे व आरोग्य सेवक शामराव गावडे यांनी देत सदर वाढणारे आजारा बाबत ग्रामस्थांना माहिती व्हावी म्हणून गावातून प्रभातफेरी काढून आरोग्यविषयक घोषणा द्वारे सदर आजाराबाबत जनजागृती करण्यात आली.

जाहिरात
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी पावसाळ्यात आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावे तसेच डांस वाढतील असे कोणतेही कचरा वस्तू टायर घराच्या आसपास ठेऊ नये तसेच पावसाळ्यात कोणता आहार घेयचा कसे कपडे वापरायचे या विषयी देखील मार्गदर्शन करण्यात आले.
जाहिरात
यावेळी शाळेच्या ब्राह्मणगाव माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनीता शिंदे यांच्या सह विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी तसेच आरोग्य सेविका मैद सिस्टर, आशा सेविका वैशाली कुमावत , मनीषा बंड , अलका अष्टेकर , पूनम कडवे, नंदा लोखंडे सोनाली बर्डे , लता खैरनार, इंगळे ताई, भुजाडे ताई आदीचे मोलाचे सहकार्य लाभले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे