आमदार आशुतोष काळे

सुवर्णभूमी थायलंडवरून आलेल्या भिक्खु संघाचे आ.आशुतोष काळेंनी केले स्वागत

सुवर्णभूमी थायलंडवरून आलेल्या भिक्खु संघाचे आ.आशुतोष काळेंनी केले स्वागत

सुवर्णभूमी थायलंडवरून आलेल्या भिक्खु संघाचे आ.आशुतोष काळेंनी केले स्वागत

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ९ जुलै २०२४:- लुम्बीनी बुद्ध विहार कोपरगाव येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल व अखिल भारतीय भिक्खु संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सुवर्णभूमी थायलंड येथून पु लुअंगपौ विरीयांग सिरिन्धरो यांचे मार्गदर्शन घेऊन आलेल्या भिक्खु संघाचे आ.आशुतोष काळे यांनी स्वागत करून त्यांचे आशीर्वाद घेतले.

जाहिरात

सुवर्णभूमी थायलंड येथून पु लुअंगपौ विरीयांग सिरिन्धरो यांचे मार्गदर्शन घेऊन आलेल्या भिक्खु संघाचे कोपरगाव शहरात अखिल भारतीय भिक्खू संघ व भारतीय बौद्ध महासभा सर्व उपासक-उपासिका कोपरगाव तालुका व शहराच्या वतीने लुम्बीनी उपवन बुद्ध विहार कोपरगाव येथे भव्य स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास आ. आशुतोष काळे यांनी उपस्थित राहून भिक्खु संघाचे कोपरगाव मतदार संघाच्या वतीने स्वागत केले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते लुम्बीनी उपवन बुद्ध विहार पर्यंत धम्म रॅली काढण्यात आली. या धम्म रॅलीमध्ये उपासक-उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जाहिरात

सुवर्णभूमी थायलंड वरून आलेल्या भन्ते मिलिंद बोधीजी, भन्ते अमृतानंदजी भन्ते आनंद सुमनसिरीजी, भन्ते दिपंकरजी, भन्ते कश्यपजी, भन्ते भारद्वाजजी, भन्ते धम्मसिरीजी,  भन्ते थेवाधम्मोजी यांच्या ज्ञानाच्या शिदोरीचा व शिकवणीचा समाजाच्या जडणघडणीत निश्चितपणे फायदा होईल असा विश्वास यावेळी आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल, अखिल भारतीय भिक्खु संघाचे सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे