कोपरगावात संस्कृत संभाषण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न
कोपरगावात संस्कृत संभाषण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न
कोपरगावात संस्कृत संभाषण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न
कोपरगाव विजय कापसे दि १२ जुलै २०२४– कोपरगाव येथील विद्याप्रबोधिनी (शिशु विकास मंदिर) या शाळेत १ जुलै ते १० जुलै दरम्यान संस्कृत संभाषण मोफत शिबिर अत्यंत उत्साहात संपन्न झाले. कोपरगांव येथे प्रथमच संस्कृतभारती मार्फत सदर शिबिर आयोजित करण्यात आले होते.शिबिराचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी भारतमाता पुजन करण्यात येऊन ध्येयमंत्राचे गायन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन तालुका संघचालक सुरेशराव विसपुते, तालुका कार्यवाह निलेश जाधव, संस्कृतभारतीचे कल्पेश येवला हे उपस्थित होते. संस्कृत शिबिर शिक्षक मयुर कुलकर्णी यांनी संस्कृत शिक्षणाची आवश्यकता स्पष्ट करुन दर महिन्यात एक संभाषण शिबिर आयोजित करण्याचा मानस उपस्थितांसमोर व्यक्त केला. उपस्थित सर्वांनीच सदर प्रस्तावास अनुमोदन दिले. सदर शिबिरातील सहशिक्षिका अनिता माळी यांनी पत्रद्वारा संस्कृत शिक्षण, गीतासोपान आणि बालकेंद्र या वर्गांबद्दल उपस्थितांना माहिती दिली. या प्रसंगी तालुका संघचालक सुरेशराव विसपुते,तालुका कार्यवाह निलेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.शिबिरात सहभागी मध्ये प्रातिनिधिक स्वरुपात भक्ती काले,वृषाली कुलकर्णी,स्मिता पोळ, दगु दरेकर यांचे सह वर्गातील विद्यार्थ्यांनी संस्कृतमधुन आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका अनिता माळी यांनी केले तर आभार स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी मानले. एकात्मता मंत्राने कार्यक्रमाचा समारोप झाला.