के जे सोमय्या कॉलेज

के. जे. सोमैया महाविद्यालयात आयोजित पालक मेळावा संपन्न 

के. जे. सोमैया महाविद्यालयात आयोजित पालक मेळावा संपन्न 

के. जे. सोमैया महाविद्यालयात आयोजित पालक मेळावा संपन्न 

कोपरगाव विजय कापसे दि १३ जुलै २०२४पाल्याचा प्रवेश घेतल्यानंतर “हा तुमचाच पाल्य नसून माझ्यासाठी देखील माझ्या पाल्यासारखाच आहे, अशी प्रतिक्रिया या महाविद्यालयातील प्राध्यापकांकडून ऐकल्यानंतर मी खरोखर भारावून गेलो. आज माझा पाल्य ९९.३०% गुण मिळवून बी. एस्सी. उत्तीर्ण झाला आहे. याचे सर्व श्रेय हे महाविद्यालय, येथील प्राध्यापक वृंद आणि येथील शैक्षणिक सुविधांना आहे,” असे प्रतिपादन के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रा. चंद्रशेखर जोशी यांनी येथे केले. स्थानिक के जे सोमैया  महाविद्यालयात आयोजित पालक मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानावरून प्रा. जोशी बोलत होते. महाविद्यालय विकास समितीचे सदस्य  सुधीर डागा यांची प्रमुख उपस्थिती होती.

जाहिरात

प्रा. जोशी यांनी आपल्या गेल्या तीन वर्षातील अनुभव कथन करीत असताना पालकांनी  पालक म्हणून जागरूक राहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे, असे सांगताना येथील प्राचार्य, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व इतर सर्व घटकांबाबत कृतज्ञता व्यक्त केली.

जाहिरात

पालक मेळाव्याचे प्रमुख अतिथी व प्रसिद्ध उद्योजक मा. सुधीर डागा म्हणाले की “गेल्या 30 वर्षांपासून या महाविद्यालयाची वाटचाल सर्वच बाबतीत अत्यंत यशस्वीपणे सुरू आहे.  त्यामुळेच बंगलोर येथील नॅक समितीने सलग दोन वेळा ‘अ’ श्रेणी मानांकन तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार’ देऊन महाविद्यालयाचा गौरव केला आहे. यापुढेही या महाविद्यालयाला अ ++ श्रेणी मिळण्यासाठी आम्ही उदंड शुभेच्छा देतो.”

जाहिरात

याप्रसंगी उपस्थित पालकांमधून प्रातिनिधिक स्वरूपात काही पालकांनी महाविद्यालयातील शैक्षणिक सुविधा संदर्भात आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया नोंदविल्या. तसेच नॅकच्या चौथ्या फेरीसाठी महाविद्यालयाला शुभेच्छा दिल्यात.
प्रभारी प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले म्हणाले की “पालकांनी केवळ प्रवेशापुरतेच महाविद्यालयात न येता वर्षभर वेळोवेळी आमच्या विनंतीला मान देऊन महाविद्यालयात येत राहावे आणि येथील शैक्षणिक सेवा-सुविधांची पाहणी करून आम्हाला आवश्यक सल्लेही द्यावेत.  विद्यार्थ्यांच्या अपडाऊनच्या गैरसोयी टाळण्यासाठी भविष्यात महाविद्यालयाचा दोन बसेस सुरू करण्याचा मानस आहे.”

जाहिरात

मेळाव्याचे प्रास्ताविक करताना अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो.  व्ही. सी. ठाणगे यांनी पालक-शिक्षक संवाद कसा महत्त्वाचा आहे, हे समजावून सांगताना आमच्या महाविद्यालयाने  काही कुटुंबातील तीन-तीन पिढ्या घडवल्या आहेत आणि त्यांच्याशी ऋणानुबंध ही जोपासले आहेत हे ही सांगितले. नॅक समितीच्या भेटीच्या अनुषंगाने पालकांनी आजच्यासारखे येत्या २६ जुलै रोजी देखील उपस्थित राहून महाविद्यालयाप्रती आपला स्नेह व्यक्त करावा, असे आवाहन केले. यावेळी उपस्थित सर्व पालकांना गुलाब पुष्प आणि महाविद्यालयाच्या ‘गोदातरंग वार्षिकांकांकाचा के. बी. रोहमारे विशेषांक’ भेट देऊन त्यांचे यथोचित स्वागत करण्यात आले. या मेळाव्याला ५० पेक्षा अधिक पालक प्राध्यापक वृंद तसेच माजी विद्यार्थी उपस्थित होते. मेळाव्याचे समन्वयक डॉ. एन.टी. ढोकळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी डॉ.  रवींद्र जाधव,  डॉ. जिभाऊ मोरे, डॉ. वसुदेव साळुंके डॉ.  अभिजीत नाईकवाडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे