एस. एस.जी. एम. महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांची प्लेसमेंट सेल द्वारे विविध कंपन्यांत निवड
एस. एस.जी. एम. महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांची प्लेसमेंट सेल द्वारे विविध कंपन्यांत निवड
एस. एस.जी. एम. महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांची प्लेसमेंट सेल द्वारे विविध कंपन्यांत निवड
कोपरगाव विजय कापसे दि १५ जुलै २०२४:- रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस् अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव व महाविद्यालय प्लेसमेंट सेलच्या वतीने दि. १४ व १५जून २०२४ रोजी महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्यू आयोजित करण्यात आले होते. या मध्ये देव सिंथेसिस, अजंठा फार्मा, मॅक केम फार्मा, सेंटुआर फार्मासिटिकल प्रायव्हेट लिमिटेड, ऑक्सिजन हेल्थकेअर, जुब्लीएंट बायज या कंपन्या सहभागी झाल्या होत्या.
या कॅम्पस इंटरव्यूमध्ये महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील देवकर वैभव बाळासाहेब, लभडे संकेत शिवाजी व शिंदे शुभम संजय या तीन विद्यार्थ्यांची देव सिंथेसिस हैदराबाद या कंपनीत, जगताप सिद्धांत संतोष ,जाधव जनार्दन मच्छिंद्र, साळुंखे दीपक आप्पा व घारे अमोल आप्पासाहेब या विद्यार्थ्यांचे अजंठा फार्मा छ.संभाजीनगर या कंपनीत, गोर्डे अजय किसन याची मॅक केम फार्मा या कंपनीत, सोनवणे चेतन ज्ञानेश्वर याची सेंट्युअर फार्मासिटिकल प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या कंपनीत व माळी अजय संजय याची ऑक्सिजन हेल्थकेअर अहमदाबाद या कंपनीत, वरूण जाधव याची नवी दिल्ली येथे जुब्लीएंट बायज या कंपनीत निवड झाली निवड झाली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड श्री.भगीरथ शिंदे साहेब यांनी अभिनंदन केले, त्याचप्रमाणे महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य मा.ॲड. संदीप वर्पे, मा.सौ. चैताली ताई काळे, मा. श्री. विवेकभैय्या कोल्हे, मा. श्री. संदीप गंगुले, मा. श्री. बाळासाहेब आव्हाड, मा. श्री.महेंद्रकुमार काले, महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य डॉ. उज्ज्वला भोर तसेच कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी यांनीही अभिनंदन केले. प्लेसमेंट समितीचे चेअरमन प्रा. दिलीप भोये यांनी यासाठी मोलाचे सहकार्य केले.
महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागात पदवी, पदव्युत्तर शिक्षणाबरोबरच पीएच.डी. संशोधन केंद्र आहे. या संशोधन केंद्राचा विद्यार्थ्यांना याचा खूप फायदा होतो. सदर विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. नामदेव चव्हाण, प्रा.अरुण देशमुख, प्रा.डॉ. मोहन सांगळे, प्रा.डॉ.दयानंद सूर्यवंशी, प्रा. चंद्रकांत चौधरी, प्रा.डॉ.प्रतिभा रांधवणे, प्रा. संजय गायकवाड, प्रा. प्रियांका काशीद, प्रा.दिपाली गाडेकर, प्रा. वैष्णवी थोरात, प्रा. सुवर्णा शिंदे, प्रा. वैष्णवी गावंड, प्रा. डॉ. रमेश कोर्डे, प्रा.अश्विनी लोहकणे या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.