के बी पी विद्यालय कोपरगाव

के.बी.पी. विद्यालयातील विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन शिबीर संपन्न

के.बी.पी. विद्यालयातील विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन शिबीर संपन्न
के.बी.पी. विद्यालयातील विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन शिबीर संपन्न
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १५ जुलै २०२४-  भूतलावर वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती नेहमीच येत असतात या आपत्ती मधून मार्ग काढण्यासाठी किंवा सुरक्षितता बाळगण्यासाठी काय काय उपाययोजना अथवा काळजी घ्यावी या विषयी कोपरगाव येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापना संबंधीचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.

जाहिरात

  या प्रसंगी कोपरगाव नगरपालिकेचे अग्निशमन विभागाचे  कर्मचारी सागर काटे, प्रमोद सिनगर, प्रशांत शिंदे, धनंजय सिनगर यांनी शालेय विद्यार्थ्यांना भूकंप, महापूर, आग लागणे अशा विविध आपत्तीवेळी स्वतःचा बचाव कसा करावा यासंबंधीचे मार्गदर्शन करत आपत्ती व्यवस्थापनासाठी वापरण्यात येणारे अग्निशमन वाहन, फोम टेंडर, लाइफ रिंग, लाईफ जॅकेट,  अग्निशामक नळकांडे, बकेट, शावेल, फोर्स पाईप, हॅंडकटर, रोप लाईन, फायरमन सूट, लेडर अशा विविध साधनांचा वापर कसा करावा यासंबंधीचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.

जाहिरात
याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जगताप के.एफ., गुरुकुल प्रमुख  सातव एस. डी., ज्येष्ठ शिक्षिका आंबरे जे.ई., पाटील एम.व्ही., विभाग प्रमुख सरोदे पी.ए. बोळीज के.एम., आरोटे एस.बी., चौरे एन.एस., ढगे सी.आर. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी सर्वांनी विद्यालयाच्या वतीने नगरपालिका कर्मचारी यांचे  आभार व्यक्त केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे