एस.एस.जी.एम. महाविद्यालयात राष्ट्रीय वुशु स्पर्धेच्या प्रशिक्षण शिबिराची सुरुवात
एस.एस.जी.एम. महाविद्यालयात राष्ट्रीय वुशु स्पर्धेच्या प्रशिक्षण शिबिराची सुरुवात
एस.एस.जी.एम. महाविद्यालयात राष्ट्रीय वुशु स्पर्धेच्या प्रशिक्षण शिबिराची सुरुवात
कोपरगाव विजय कापसे दि ६ डिसेंबर २०२४–महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवा सेवा संचालनालय सेवा संचालनालय आणि एस. एस. जी. एम. कॉलेज, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली येथे रविवार दिनांक ८ ते १५ डिसेंबर २०२४ दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय वुशु क्रीडा स्पर्धेच्या प्रशिक्षण शिबिराची सुरुवात बुधवार दिनांक ३ डिसेंबर पासून ७ डिसेंबर २०२४ या कालावधीत झाली असून सदर क्रीडा स्पर्धेच्या प्रशिक्षण प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
या प्रसंगी वुशू या क्रीडा प्रकाराचे संघ व्यवस्थापक दीपक धनवटे, धर्मनाथ घोरपडे संगम मार्गदर्शक सागर मोहिते संघ मार्ग दर्शिका कुमारी तेजस्विनी पाटील उपस्थित होत्या. सदर क्रीडा प्रशिक्षण सराव यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता जिमखाना विभागाचे डॉ. विशाल पवार व प्राध्यापक सुनील कदम यांनी परिश्रम घेतले.