एस. एस. जी. एम. महाविद्यालयात ‘लोकसंख्या दिन’ उत्साहात साजरा
एस. एस. जी. एम. महाविद्यालयात ‘लोकसंख्या दिन’ उत्साहात साजरा
एस. एस. जी. एम. महाविद्यालयात ‘लोकसंख्या दिन’ उत्साहात साजरा
कोपरगाव विजय कापसे दि १६ जुलै २०२४– रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला . संयुक्त राष्ट्र संघाच्या विकास विषयक कार्यक्रमाच्या गव्हर्निंग कौन्सिलने ११जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून १९८९ पासून सुरू केलेला आहे. ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून जगभरात दरवर्षी साजरा होत असतो. सदर कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य डॉ. उज्ज्वला भोर यांनी भूषविले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भूगोल विभागातील प्रा. डॉ. देविदास रणधीर हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात “वाढती लोकसंख्या ही एक समस्या आहे. त्यासाठी उपाययोजना केली पाहिजे यावर विचार मंथन होणे गरजेचे आहे. भारत हा अतिरिक्त लोकसंख्या असलेला देश आहे. लोकसंख्येवर जर नियंत्रण झाले तर अधिक विकास होईल लोकसंख्या ही एक साधन संपत्ती आहे”. असे सांगितले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्यांनी “भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. अब्दुल कलाम यांनी पाहिलेले स्वप्न चिन्ह लोकसंख्येचा उपयोग करून वाढवलेली उत्पादकता व आर्थिक क्षमता या पार्श्वभूमीवर आपली लोकसंख्या ही समस्या न करता संपत्ती व्हावी असा संकल्प या लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने करू या.” अशी इच्छा व्यक्त केली. या कार्यक्रमाचे संयोजन अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. बंडेराव तऱ्हाळ यांनी केले .
या कार्यक्रमासाठी कला विभागाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. बाबासाहेब शेंडगे, डॉ. माधव यशवंत, डॉ. वैशाली सुपेकर, डॉ. रंजना वर्दे,प्रा.किरण पवार यांसह प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. बंडेराव तऱ्हाळ यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सीमा दाभाडे तर सूत्रसंचालन प्रा.डॉ. योगिता भिलोरे व प्रा. अश्विनी पाटोळे यांनी केले.