संगमनेर

संग्राम मतिमंद विद्यालयाचे काम कौतुकास्पद – आमदार सत्यजित तांबे

संग्राम मतिमंद विद्यालयाचे काम कौतुकास्पद – आमदार सत्यजित तांबे
संग्राम मतिमंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतला वारीचा आनंद
जाहिरात

संगमनेर प्रतिनिधी दि १६ जुलै २०२४पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक वैभव आहे. या वारीला अनेकांना जाता आले नसले तरी संग्राम संचालित डॉ. देवेंद्र ओहरा मतिमंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात विविध वेशभूषा परिधान करून या आषाढी वारीचा आनंद घेतला.

जाहिरात

डॉ.संग्राम ओहरा निवासी मतिमंद विद्यालय आषाढी वारी साजरी करण्यात आली. यावेळी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते पूजा करून वारीला सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी मुख्याध्यापक चांगदेव खेमनर,सुनील कवडे,आनंद आले, डी. एस. देशमुख, भाऊसाहेब नरोडे,राजीव गोरे,शैला जाधव,अर्चना मंतोडे,रावसाहेब पगारे आदि शिक्षक उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अपंग व मतिमंद विद्यालयासाठी आदर्शवत काम करणाऱ्या संग्राम मूकबधिर मतिमंद विद्यालयाने आपल्या गुणवत्तेने कायमच राज्यात लौकिक निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहेत. आषाढी वारी निमित्त या विद्यार्थ्यांना संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर,विठ्ठल रुक्मिणी,निवृत्तीनाथ, मुक्ताबाई सोपान, तुकाराम, चोखामेळा या संतांची वेशभूषा परिधान करून दिंडी काढण्यात आली.

जाहिरात

यावेळी आ.तांबे म्हणाले की, अपंग व मतिमंद विद्यालय विशेष व्यक्ती म्हणून काम केले जात आहे. या शाळेतील हे विद्यार्थी विशेष असल्याने त्यांच्या या आषाढी वारीला विशेष महत्त्व आहे. आज वेगवेगळ्या वेषभूषा करून ही बालगोपाल अत्यंत आनंदी आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकतेचे प्रतीक म्हणून दरवर्षी संग्राम मतिमंद विद्यालयाचे विद्यार्थी विद्यालयाच्या प्रांगणात विविध वेशभूषा करून या आषाढी वारीचा आनंद घेत असतात. असे हि ते यावेळी म्हणाले.

मुख्याध्यापक चांगदेव खेमनर म्हणाले की, संगमनेर तालुक्यात आमदार बाळासाहेब थोरात व आ.डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अपंग व मतिमंद विद्यार्थ्यांसाठी विशेष लक्ष दिले जाते.विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार होणे हे अत्यंत गरजेचे आहे. आणि बाल वयातच महाराष्ट्र विविध परंपरा देशप्रेम या सर्वांची ओढ निर्माण करण्यासाठी संग्राम मतिमंद विद्यालय नेहमीच विविध उपक्रम राबवत असते.सामाजिक समतेचा शिकवण देणारी ही आषाढी दिंडी सर्वांसाठी नक्की आनंददायी असल्याचे ते म्हणाले. यावेळी पांडुरंग पांडुरंग हरी नामाचा गजर टाळ चिपळ्यांच्या निनादात काढलेली या विद्यार्थ्यांची दिंडी विशेष आकर्षण ठरली आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे