आमदार आशुतोष काळे

तिळवणी प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी पुण्याचे काम; तिळवणीसह पंचक्रोशितील नागरिकांनी मानले आ. आशुतोष काळे यांचे आभार

तिळवणी प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी पुण्याचे काम; तिळवणीसह पंचक्रोशितील नागरिकांनी मानले आ. आशुतोष काळे यांचे आभार

तिळवणी प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी पुण्याचे काम; तिळवणीसह पंचक्रोशितील नागरिकांनी मानले आ. आशुतोष काळे यांचे आभार

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १८ जुलै २०२४ – कोपरगाव मतदार संघाच्या पूर्व भागातील नागरिकांची मागणी पूर्ण करून आ. आशुतोष काळे यांनी तिळवणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी मिळवली आहे. त्यामुळे पूर्व भागातील तिळवणीसह पंचक्रोशीतील अनेक गावांच्या नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्याबद्दल तिळवणीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले. आ. आशुतोष काळे यांनी खूप पुण्याचे काम केले असून त्याची परतफेड तिळवणी,कासली, शिरसगाव, आपेगाव, उक्कडगाव, सावळगाव, गोधेगाव, घोयेगाव गावातील सुज्ञ मतदार विधानसभा निवडणुकीत करून देणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

जाहिरात

तिळवणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळवून आणल्याबद्दल तिळवणीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी कोपरगाव येथे आ. आशुतोष काळे यांचा असंख्य नागरिकांनी सत्कार करुन त्यांचे आभार मानले.

जाहिरात

यावेळी आमदार आशुतोष काळे म्हणाले की, तिळवणी गावासह परिसरातील कासली, शिरसगाव, आपेगाव, उक्कडगाव, सावळगाव, गोधेगाव, घोयेगाव आदी गावांचा आरोग्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी कोपरगाव वैजापूर तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या तिळवणी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे अशी या गावातील नागरिकांची मागणी होती. नागरिकांच्या मागणीची दखल घेवून याबाबत आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करून तिळवणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी मिळविली आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी लवकरात लवकर निधी मिळवून देऊन प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम सुरू करण्यासाठी पाठपुरावा करू अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.याप्रसंगी तिळवणी व पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचे संचालक, तसेच तिळवणी,कासली, शिरसगाव, आपेगाव, उक्कडगाव, सावळगाव, गोधेगाव, घोयेगाव आदी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

चौकट – आ. आशुतोष काळे यांनी पूर्व भागातील तिळवणी,कासली, शिरसगाव, आपेगाव, उक्कडगाव, सावळगाव, गोधेगाव, घोयेगाव आदी गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तिळवणीला मंजूर करून आणलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. रात्रीच्या वेळी नागरीकांना आरोग्य सेवा आवश्यक असल्यास तब्बल नऊ ते दहा किलोमीटर दहेगाव बोलका येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा आधार घ्यावा लागत होता. हे दहा किलोमिटर अंतर पार करून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचेपर्यंत जीव टांगणीला लागत असे.त्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी आमची खूप मोठी अडचण दूर केली आहे हे सांगताना नागरिक भावनाविवश झाले होते यावरून तिळवणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे महत्व अधोरेखित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे