आमदार आशुतोष काळे

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ३९ कि.मी.रस्त्यासाठी ६३.१० कोटी निधीस प्रशासकीय मान्यता -आ.आशुतोष काळे

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ३९ कि.मी.रस्त्यासाठी ६३.१० कोटी निधीस प्रशासकीय मान्यता -आ.आशुतोष काळे

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ३९ कि.मी.रस्त्यासाठी ६३.१० कोटी निधीस प्रशासकीय मान्यता -आ.आशुतोष काळे

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १९ जुलै २०२४ :- कोपरगाव मतदार संघातील ३९ किलोमीटर रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ संशोधन विकास अंतर्गत तब्बल ६३.१० कोटी निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यानी दिली आहे.

जाहिरात

सत्ताधारी पक्षाचा आमदार होण्याच्या संधीचा आ.आशुतोष काळे यांनी योग्य उपयोग करून घेत मतदार संघाच्या विकासासाठी आजवर एकाही सत्ताधारी आमदाराला न जमलेली कामगिरी करून दाखवतांना मतदार संघाच्या विकासासाठी ३००० कोटींचा निधी आणला आहे. या निधीतून मतदार संघातील रस्ते, पाणी, आरोग्य, वीज आदी मुलभूत प्रश्न सुटले आहेत. एकाच पंचवार्षिकमध्ये वर्षानुवर्षांपासून प्रलंबित असेलेली विकासकामे सोडवून दाखविणारे आ. आशुतोष काळे यांनी सत्ताधारी आमदार झाल्याच्या संधीचे सोने केले आहे. त्यामुळे मतदार संघात कधी नव्हे एवढी विकासकामे झाल्यामुळे मतदार संघातील जनता समाधानी आहे. मात्र निधी मिळविण्याची व विकासकामांना लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता मिळून हि कामे लवकरात लवकर कधी सुरु होतील यासाठी त्यांची सातत्याने धडपड व प्रयत्न सुरु असतात.

जाहिरात

याच प्रयत्नातून मतदार संघातील एकूण ३९ किलोमीटरच्या रस्त्यांच्या कामासाठी ६३.१० कोटी निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये ओगदी ते करंजी रस्ता ४.८७ कोटी, कुंभारी ते बडे वस्ती, काळे वस्ती ते रामा-७ रस्ता ०६.०९ कोटी, एम.डी.आर.-४ मुखेड फाटा ते सांगवी भुसार रस्ता ५.३५ कोटी, एम.डी.आर.-४ ते मायगाव देवी रस्ता ०८.१२ कोटी, राज्यमार्ग ७ ते कोळपेवाडी ते कोळगाव थडी रस्ता ४.९१ कोटी, रा.मा.०७ ते कोळपेवाडी-सुरेगाव रस्ता १०.०१ कोटी, रा.मा. ३५ वेस, सोयगाव ते काकडी, मल्हारवाडी रस्ता ११.५७ कोटी, सोनारी ते टाकळी रस्ता ६.६९ कोटी, टाकळी ते देवी वस्ती ते एम.डी.आर.-०८ रस्ता ५.४५ कोटी या रस्त्यांचा समावेश आहे. मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांना आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होवून रस्त्यांची समस्या कायमची मार्गी लागणार असल्यामुळे या रस्त्यांने नियमित ये-जा करणाऱ्या सबंधित गावातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे