साकरवाडीच्या सोमैया विद्यालयास स्वच्छ शाळा म्हणून राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार
साकरवाडीच्या सोमैया विद्यालयास स्वच्छ शाळा म्हणून राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार
कोपरगाव तालुक्यातील साकरवाडी येथील सोमैया विद्यामंदिर विद्यालयास गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता स्पर्धेत ग्रामीण भागातील तृतीय पुरस्कार
कोपरगाव विजय कापसे दि २३ जुलै २०२४– सोमैया विद्याविहार, मुंबई संचलित सोमैया विद्यामंदिर साकरवाडी विद्यालयास गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता अंतर्गत ग्रामीण भागातून तृतीय क्रमांकाचे स्वच्छ शाळा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव तसेच जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता २०२४ या राज्यस्तरीय स्पर्धेत ग्रामीण भागातील शाळांमधून विशेष कामगिरी बजावल्या बद्दल २१ हजार रुपये रोख व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या पारितोषिकाचे वितरण शनिवार दिनांक २० जुलै २०२४ रोजी गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात थोर अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर,जैन इरिगेशन सिस्टीम चे अध्यक्ष अशोकजी जैन व डॉ सुदर्शन अय्यंगार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका पारे मॅडम,परीक्षा समन्वयक महिंद्रकर सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद ,सर्व विद्यार्थी यांनी विद्यालयात स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची रुजवणूक करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले. विद्यालयाला हा पुरस्कार प्राप्त होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष समीरभाई सोमैया , सचिव लेफ्टनंट जनरल जगबीर सिंग, शाळा सेक्रेटरी सुहास गोडगे , शाळा समिती सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.