गोदावरी बायोरिफायनरीज लि. च्या वतीने आंब्याची रोपे तसेच ट्री गार्ड वारी ग्रामपंचायतीला सुपूर्त
गोदावरी बायोरिफायनरीज लि. च्या वतीने आंब्याची रोपे तसेच ट्री गार्ड वारी ग्रामपंचायतीला सुपूर्त
गोदावरी बायोरिफायनरीज लि. च्या वतीने आंब्याची रोपे तसेच ट्री गार्ड वारी ग्रामपंचायतीला सुपूर्त
कोपरगाव विजय कापसे दि १८ सप्टेंबर २०२४ – वृक्ष हा सुदृढ पर्यावरणाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. वृक्ष लागवड, संवर्धन आणि संरक्षण त्याचबरोबर वातावरण बदलामधील त्याचे सकारात्मक कार्य अधोरेखित करण्यासाठी तालुक्यातील वारी साकरवाडी येथील सोमैया उद्योग समूहाच्या गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड या प्रकल्पाच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामपंचायत वारी येथे १००० केशर आंब्याचे रोपे तसेच १५० वृक्ष संरक्षक जाळी (ट्री-गार्ड) देण्यात आले. ही सर्व झाडे जगून हिरवीगार राहावे यासाठी त्या झाडांची संरक्षण संवर्धना करण्याची गरज आहे या करीता संचालक श्री. सुहास गोडगे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
वारी येथे सोमैया उद्योग समूहाचे स्वातंत्र्यपूर्व काळापासून मोठा प्रकल्प आहे. सोमैया उद्योग समूहाचे अध्यक्ष समीर सोमैया यांच्या संकल्पनेतून परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगाराची उपलब्धी झाली आहे तसेच संचालक सुहास गोडगे यांच्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे सामाजिक कार्य सुरू असतात. पर्यावरण संवर्धनासाठी तर नेहमीच पुढाकार असतो. १९७२ सालापासून या प्रकल्पात पर्यावरण दिन सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या सप्ताहाच्या माध्यमातून दरवर्षी लाखो झाडांची लागवड करून संवर्धन करण्यात येते.
गोदावरी बायोरिफायनरीज लि. साकरवाडी च्या वतीने संचालक सुहास गोडगे यांच्या हस्ते केशर आंब्याची रोपे तसेच ट्री गार्ड ग्रामपंचायत वारी यांना सुपूर्त करण्यात आले. यावेळी लोकनियुक्त सरपंच योगिताताई बद्रीनाथ जाधव, उपसरपंच विजय गायकवाड, गोदावरी बायोरिफायनरीज लि. साकरवाडीचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील, पर्यावरण अधिकारी सुरज वाणी, विजय थोरात तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यावरण संतुली समृद्ध गाव करण्याकरीता रोपांचे संरक्षण व संवर्धनासाठी लोखंडी ट्री गार्ड अतिशय उपयुक्त ठरणार असून सोमैया उद्योग समूहाचे आमच्या गावातील विविध उपक्रमांसाठी नेहमीच सहकार्य असते.
योगिताताई बद्रीनाथ जाधव
लोकनियुक्त सरपंच वारी