आपला जिल्हा

डॉ. बाबासाहेब यांचे कार्य जगासाठी प्रेरणादायी-परशराम साबळे 

डॉ. बाबासाहेब यांचे कार्य जगासाठी प्रेरणादायी-परशराम साबळे

डॉ. बाबासाहेब यांचे कार्य जगासाठी प्रेरणादायी-परशराम साबळे 
जाहिरात

कोपरगाव प्रतिनिधी दि ६ डिसेंबर २०२५भारतीय  राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य सबंध जगासाठी एक प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ परशराम साबळे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करते प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

जाहिरात

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शनिवार दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी ६९ वा  महापरिनिर्वाणदिन निमित्ताने संबंध जगभर त्यांना अभिवादन केले जात असून याच निमित्त ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेत डॉ. बाबासाहेबांना ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ परशराम साबळे, कमलाताई बाळासाहेब सातभाई तांत्रिक ज्युनिअर कॉलेजचे प्रा. विशाल धरणगावकर, बाळासाहेब सातभाई कौशल्य विकास संस्थेचे प्रा.विजय कापसे, प्रा जनार्दन सुपेकर, निलेश देवकर आदि शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले.

जाहिरात

 या प्रसंगी डॉ साबळे यांनी पुढे बोलताना सांगितले की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला दिलेली राज्यघटना ही जगातील सर्वात श्रेष्ठ अशी सर्वोच्च घटना आहे. यामुळे सर्व नागरिकांना समतेचा अधिकार प्राप्त झाल्याने देशात समता व बंधुत्व सुखाने नांदत आहे. तर डॉ बाबासाहेब यांचे कार्य संपूर्ण जगासाठी एक प्रेरणादायी असल्याने शालेय अभ्यासक्रमात मोठ्या प्रमाणात डॉ. बाबासाहेबांच्या कार्याचा समावेश करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत अभिवादन केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे