आ. आशुतोष काळेंच्या वाढदिवसानिमित गौतम पब्लिक स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव-प्राचार्य शेख
आ. आशुतोष काळेंच्या वाढदिवसानिमित गौतम पब्लिक स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव-प्राचार्य शेख
आ. आशुतोष काळेंच्या वाढदिवसानिमित गौतम पब्लिक स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव-प्राचार्य शेख
कोपरगाव विजय कापसे दि ३० जुलै २०२४:– कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलच्या भव्य मैदानावर संस्थेचे मागर्दर्शक व विश्वस्त आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.
क्रीडा क्षेत्रात दबदबा ठेवणाऱ्या गौतम पब्लिक स्कूलने जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. संस्थेच्या माजी चेअरमन स्व. सौ. सुशीलामाई काळे उर्फ माई यांच्या स्मृतिदिनानिमित्त संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेले गौतम पब्लिक स्कूलचे ‘माईज गार्डन’ विविध फुलांनी फुलले आहे. गुलाब, शेवंती, जरबेरा, कन्हेर, पारिजात, जास्वंदी जातीचे विविध रंगी फुले फुलली असून फुलांचा सुगंध वातावरणात दरवळत असतो. बागेला सुंदर असे कोनो कार्पसचे हिरवेगार कुंपण असून सुंदर बागेमुळे गौतम पब्लिक स्कूलच्या वैभवात भर पडली आहे. या गार्डन मध्ये असलेल्या देशी विदेशी फुलझाडांमुळे विद्यार्थ्यांसाठी अगोदरच निर्सगरम्य असलेले वातावरण अतिशय प्रसन्न झाले असून त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी त्याचा फायदा होवून त्यांची अधिकची गुणवत्ता वाढ होण्यास मदत होणार आहे. या परिसराचा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सहवास घडविण्यासाठी गौतम पब्लिक स्कूलमध्ये आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित (दि.३ व ४ ऑगस्ट) रोजी भव्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या क्रीडा महोत्सवाचे उदघाटन संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते व विश्वात्मक जंगली महाराज ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत (दि.०३) ऑगस्ट रोजी होणार असून बक्षीस वितरण सोहळा आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते होणार आहे. सदर क्रीडा महोत्सवात फुटबॉल, हॉकी व मुलींचे हॉलीबॉलच्या सामन्यांचा थरार क्रीडा प्रेमीना याची देही, याची डोळा अनुभववास मिळणार आहे. या क्रीडा महोत्सवात अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील अनेक मैदाने गाजविणारे मातब्बर संघ सहभागी होणार असून यासाठी गौतम पब्लिक स्कूलचे फुटबॉल, हॉकी व हॉलीबॉल सर्व सुविधा असलेले भव्य-दिव्य मैदाने सज्ज करण्यात आली आहेत.
क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक सुधाकर निलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, फुटबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव, व्हॉलीबॉल प्रशिक्षक इसाक सय्यद, सर्व हाऊस मास्टर्स व शिक्षक आपली जबाबदारी पार पाडत आहेत. सहभागी खेळाडू व प्रशिक्षकांची जेवणाची सोय शाळेकडून करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त संघांनी क्रीडा महोत्सवात सहभाग नोंदवावा असे आवाहन तालुक्यातील क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा शिक्षक यांना केले असून नाशिक व पुणे जिल्ह्यातील खेळाडू देखील या स्पर्धेत सहभाग घेणार असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे. त्यामुळे अतिशय भव्य दिव्य स्वरुपात या स्पर्धा होणार असल्याचे दिसून येत आहे.