युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी टाकळी ते अंतापुर ताहाराबाद पायी पालखीस दिल्या शुभेच्छा
टाकळी ते अंतापुर ताहाराबाद पायी पालखीस युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी दिल्या शुभेच्छा
कोपरगाव विजय कापसे दि १ ऑगस्ट २०२४–कोपरगाव तालुक्यातील टाकळी गावातून परंपरेप्रमाणे जय दावल मलिक बाबा भक्त परिवारादच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या श्री क्षेत्र टाकळी ते क्षेत्र अंतापूर ताराहाबाद पायी पालखीस सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांन दर्शन घेऊन पायी प्रवास करणाऱ्या भाविकांना शुभेच्छा दिल्या.
अध्यात्मिक वातावरण जपणारे टाकळी हे आदर्श गाव आहे.मोठ्या प्रमाणात धार्मिक उत्सव साजरे करून पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. युवकांमध्ये सामाजिक ऐक्य टिकविण्यासाठी आणि अध्यात्मिक विचारसरणी रुजण्यासाठी अशा पालखी अतिशय मोलाचे काम करतात. जय दावल मलिक बाबा भक्त परिवार आयोजित करत असलेल्या या धार्मिक उपक्रमास माझ्या शुभेच्छा असून कोल्हे परिवार नेहमी आपल्या उत्साहात सहभागी आहे असे प्रतिपादन विवेकभैय्या कोल्हे यांनी केले आहे.
या प्रसंगी ह.भ. प उंडे महाराज,रामदास देवकर,चंद्रकांत देवकर, टी.डी.बी चेअरमन अंबादास देवकर,सोपान देवकर,व्हा.चेअरमन मनेष गाडे, राजेंद्र कोळपे,विक्रम पाचोरे, निलेश देवकर, सरपंच संदीप देवकर,अंबादास ल. देवकर, सतीश देवकर, लक्ष्मण मालकर, मा. सभापती सुनील देवकर, आण्णा देवकर, बाळासाहेब ननावरे, राजेंद्र देवकर,स्वप्नील देवकर,श्रावण बाबा वाघ, रवींद्र पिंपळे, सोमनाथ देवकर, अशोक गांगुर्डे, रफिक सय्यद,चांगदेव बंद्रे आदींसह भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.