सातभाई कॉलेजच्या वतीने डॉ. आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
सर्वत्र साजरी होत आहे १०४ वी जयंती
कोपरगाव विजय कापसे दि १ ऑगस्ट २०२४–एक मराठी समाज सुधारक, लोककवी, लेखक असलेले तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच डॉ आण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखन सामाजिक आणि राजकीय कृतीशीलतेने संपूर्ण जगात नावलौकिक मिळवत ओला एक वेगळा ठसा उमटविला असून आज गुरुवार दि १ऑगस्ट रोजी सबंध जगभरात त्यांची १०४ वी जयंती मोठ्या जल्लोषात साजरी होत असते त्याच अनुषंगाने कोपरगाव येथील ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे बाळासाहेब सातभाई कौशल्य विकास संस्थेत देखील डॉ आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे, कमलाताई बाळासाहेब सातबारा तांत्रिक ज्युनिअर कॉलेजचे प्रा विशाल धारणगावकर, बाळासाहेब सातभाई कौशल्य विकास संस्थेचे क्लर्क निलेश देवकर आदी उपस्थित होते.
या प्रसंगी ओम साई राम शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे यांनी डॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची माहिती सांगत त्यांना अभिवादन केले.