आपला जिल्हा

एम के आढाव विद्यालयात वकृत्व स्पर्धेतील विजेते विद्यार्थ्यांना बक्षीसांचे वितरण

एम के आढाव विद्यालयात वकृत्व स्पर्धेतील
विजेते विद्यार्थ्यांना बक्षीसांचे वितरण
लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी व डॉ आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केली होती वक्तृत्व स्पर्धा
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३ ऑगस्ट २०२४कोपरगाव नगरपरिषद शिक्षण मंडळ मा.माधवराव कचेश्वर आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांच्यात वक्तृत्व गुणसंपन्न निर्माण तसेच त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी व डॉ आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले प्रारंभी प्रतिमेचे पूजन उल्हारे सर,माळी सर, शिंदे सर यांच्या हस्ते करण्यात आले.

जाहिरात
इयत्ता पाचवी ते सातवी लहान गट तसेच आठवी ते नववी मोठा गट तसेच उत्कृष्ट पाठांतर स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थी सहभागी होऊन स्पर्धेत सहभाग नोंदविला होता विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले.या स्पर्धेचे उल्हारे सर यांनी नियोजनबद्ध परीक्षण केले व या दोन महान व्यक्ती ची माहिती विशद केली व विद्यार्थ्यांना त्यांच्या कर्तृत्वाची माहिती देण्यात आली. ब्रिटिशांना सळोकी  पळो करून सोडणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य मी  मिळवणारच तो माझा जन्मसिद्ध हक्क या घोषणेने संपूर्ण भारत देश प्रेरित झाला होता तसेच साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या याबद्दल सविस्तर विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. यात सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोराडे मॅडम यांनी केले.या प्रसंगी मुख्याध्यापक श्रीमती भावना गवांदे मॅडम व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यालयाचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे