आत्मा मलिक हॉस्पिटल

आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकुल मध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकुल मध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकुल मध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

जाहिरात

येवला प्रतिनिधी दि ३ ऑगस्ट २०२४विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवला येथे गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांच्या मार्गदर्शनातून व प्रेरणेतून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व *लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती* साजरी करण्यात आली.

जाहिरात

याप्रसंगी प्राचार्य तुषार कापसे व मठाधिपती संत चरणदास महाराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजन करण्यात आले. शिव अहिरे, काव्या गायकवाड, प्राजक्ता भगत, खुशी वावळकर, रुद्रायणी खर्डे,कोमल शिंदे,समीक्षा जोरी, ईश्वरी धनवटे,संस्कृती जगताप,कावेरी खिराडकर,श्लोक नाईक, ईश्वरी आसने, श्रुती आघाव, श्रद्धा भावसार या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी माहिती सांगितली. शौर्य कंदलकर या विद्यार्थ्याने लोकमान्य टिळक यांची वेशभूषा धारण करून लोकमान्य टिळक तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना भेटावयास इथे स्वतः आले आहे असे भाषण केले.
उपशिक्षिका वैष्णवी गायकवाड यांनी लोकमान्य टिळक यांच्या विषयी सखोल माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. तसेच प्राचार्य तुषार कापसे व संत चरणदास महाराज यांनीदेखील विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या विषयी अधिक माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा गवळी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

जाहिरात
Oplus_131072

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे