आपला जिल्हा

कोळपेवाडी पंचक्रोशीतील जेष्ठ व्यक्तीमत्व बबनराव तुकाराम हाळनोर यांचे निधन

कोळपेवाडी पंचक्रोशीतील जेष्ठ व्यक्तीमत्व बबनराव तुकाराम हाळनोर यांचे निधन

कोळपेवाडी पंचक्रोशीतील जेष्ठ व्यक्तीमत्व बबनराव तुकाराम हाळनोर यांचे निधन
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २० एप्रिल २०२४कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील जेष्ठ व्यक्तिमत्त्व, प्रगतीशील शेतकरी, प्रतिष्ठित उस तोडणी कंत्राटदार,गोरगरीबांचे कैवारी बबनराव तुकाराम हाळनोर यांचे शनिवारी दुपारी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले ते ७८ वर्षांचे होते.

जाहिरात
आपल्या आयुष्यात कष्ट, संघर्ष आणि जिद्द या जोरावर त्यांनी उसतोडणी क्षेत्रात आपले विश्व निर्माण केले.माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले बबनराव “दादा”म्हणुन परीचित होते.बबनराव तुकाराम हाळनोर हे पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक ज्ञानेश्वर हाळणोर, मच्छिंद्र हाळनोर, मिराताई श्रावण शेंडगे व सुरेखा जालिंदर कोळपे यांचे वडील होते.

जाहिरात
त्यांचा अंत्यविधी शनिवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात कोळपेवाडी वैकुंठधाम येथे झाला. हाळनोर यांच्या रुपाने जुन्या पिढीतील न्यायनिवाडा करणारे करारी व्यक्तिमत्त्व हरपल्याने पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.त्यांच्या निधनाबद्दल माजी आमदार अशोक काळे,विद्यमान आमदार आशुतोष  काळे आदींनी शोक व्यक्त केला आहे

जाहिरात
बबनराव तुकाराम हाळनोर

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे