संगमनेर

आ.थोरात यांच्या प्रयत्नातून अभ्यासिका व ग्रंथालयांसाठी ३ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर – डॉ.जयश्रीताई थोरात

आ.थोरात यांच्या प्रयत्नातून अभ्यासिका व ग्रंथालयांसाठी ३ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर – डॉ.जयश्रीताई थोरात

 

डॉ.जयश्री थोरात यांची संकल्पना : राज्यातील प्रथम आदर्शवत प्रकल्प

संगमनेर प्रतिनिधी दि ४ ऑगस्ट २०२४- यशवंतराव चव्हाण यांचे समृद्ध वारसदार  असलेले काँग्रेस पक्षाचे नेते तथा मा. शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी सहकार, शिक्षण, शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था, दूध व्यवसाय, या सर्व क्षेत्रातून संगमनेर तालुका हा राज्यासाठी आदर्शवत मॉडेल बनवला आहे. तरुणांना विविध स्पर्धा परीक्षा व वाचनाकरता अद्यावत सुविधा उपलब्ध व्हाव्या याकरता राज्यातील आदर्शवत प्रकल्प राबवताना तालुक्यातील ९ गावांमध्ये अभ्यासिका व ग्रंथालयांकरता ३ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर  असल्याची माहिती युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी दिली आहे.

जाहिरात

याबाबत अधिक माहिती देताना डॉ.थोरात म्हणाल्या की, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करताना तालुक्याला विकासातून गौरवशाली बनवले. संगमनेर हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र झाले असून अनेक युवक व युवतींना स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षांसाठी अभ्यासाची चांगली सुविधा व्हावी. तसेच तालुक्यातील युवकांमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी याकरता युवा संवाद केंद्र अभ्यासिका ग्रंथालय आणि ई लायब्ररी उभारण्यात येणार आहे.

जाहिरात

कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांनी तालुक्यातील युवकांशी साधलेल्या युवा संवाद यातून विविध गावांमध्ये अभ्यासिका व ग्रंथालय करण्याची संकल्पना पुढे आली याकरता डॉ.जयश्रीताई थोरात यांनी पाठपुरावा केला आणि वाचन संस्कृती वाढवण्याकरता राज्यातील आदर्शवत मॉडेल उभारले जाणार आहे. यामध्ये संगमनेर खुर्द , चंदनापुरी धांदरफळ बुद्रुक, समनापुर, कोकणगाव, राजापूर ,डोळासने, तळेगाव दिघे, नान्नज दुमाला, डिग्रस ,निमगाव बुद्रुक व वेल्हाळे येथे हे येथील युवा संवाद केंद्र अभ्यासिका ग्रंथालय आणि ई लायब्ररीच्या विकास कामांसाठी प्रत्येक गावासाठी ३० लाख रुपये असे एकूण नऊ गावातील लायब्ररी साठी ३ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

जाहिरात

यातून अद्यावत लायब्ररी अभ्यासिका ई लायब्ररी निर्माण केली जाणार आहे संगमनेर तालुक्यात हे राज्यभरातील पहिलेच मॉडेल ठरणार असून यामुळे तरुण वर्गात वाचन संस्कृती वाढण्यास मोठी मदत होणार असल्याने या अभिनव उपक्रमाचे संगमनेर तालुक्यातील सर्व युवक युवती महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वांनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात

या गावांमध्ये अभ्यासिका व ग्रंथालय

मा.शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील युवकांना युवा संवाद केंद्र, अभ्यासिका, ग्रंथालय व ई- लायब्ररी हा राज्यभरात पहिल्याच आदर्शवत उपक्रम होत असून संगमनेर खुर्द ,चंदनापुरी, धांदरफळ बुद्रुक, समनापूर, कोकणगाव, राजापूर, डोळसने, तळेगाव दिघे, नान्नज दुमाला, डीग्रस, निमगाव बुद्रुक व वेल्हाळे येथे या अद्यावत लायब्ररी सह अभ्यासिका होणार आहेत.

आ थोरात व डॉ जयश्री थोरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे