आ. थोरात यांच्या पाठपुराव्यातून तालुक्यातील रस्त्यांसाठी १ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर
आ. थोरात यांच्या पाठपुराव्यातून तालुक्यातील रस्त्यांसाठी १ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर
संगमनेर विजय कापसे दि ४ ऑगस्ट २०२४– काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून गावातील मूलभूत सुविधा पुरवणे योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यामधील विविध गावांच्या रस्त्यांच्या मजबुतीकरण कामासाठी १ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात यांनी दिली आहे.
तालुक्यात विविध रस्त्यांकरता निधी मिळून मजबूत रस्त्यांचे जाळे होणार असून नव्याने कासारा दुमाला ते सावंत वस्ती या रस्त्याच्या मजबुती करण्यासाठी १५ लाख रुपये, पिंपरने ते जोरवेकर वस्ती रस्ता मजबुतीकरण करण्यासाठी १५ लाख रुपये ,अंभोरे येथील तेल घाट खेमनर वस्ती मजबुती करण्यासाठी १५ लाख रुपये, उंबरी बाळापूर येथील लेंडी नाला ते गावठाण रस्ता मजबुती करण्यासाठी १५ लाख रुपये, कोकणगाव ते पानसरवाडी रस्ता मजबुती करण्यासाठी १५ लाख रुपये, समनापुर ते शिर्डी पालखी रस्ता मजबुतीकरण करण्यासाठी १५ लाख रुपये, निमज ते खंडोबा मंदिर रस्ता मजबुती करण्यासाठी १५ लाख रुपये ,पारेगाव खुर्द येथील होळकर वस्ती रस्ता मजबुती करण्यासाठी १० लाख रुपये ,ढोलेवाडी येथील हॉटेल ग्रेप्स ते गॅलेक्सी रस्ता मजबुती करण्यासाठी १५ लाख रुपये आणि ढोलेवाडी येथीलच पवार वस्ती ते ताजने मळा या रस्त्याच्या मजबुती करण्यासाठी १० लाख रुपये असे एकूण एक कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या निधीमधून या गावांमधील रस्त्यांची खडीकरण व मजबुतीकरण होणार आहे. यामुळे कासारा दुमाला, पिंपरने, अंभोरे, उंबडी बाळापूर, कोकणगाव, समनापुर, निमज, पारेगाव खुर्द, ढोलेवाडी येथील नागरिकांना दळणवळणाची अधिक चांगली सुविधा निर्माण होणार आहे. हा निधी मंजूर झाला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती इंग्रजी भाऊ थोरात यांनी आहे. या गावांमधील रस्त्याच्या कामांकरता निधी मंजूर झाल्याबद्दल वरील गावांमधील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.