संत जनार्धन स्वामी महर्षी शाळा

महर्षीचा नागासाई गुंडा सी. ए. फौंडेशन ची परीक्षा उत्तीर्ण

महर्षीचा नागासाई गुंडा सी. ए. फौंडेशन ची परीक्षा उत्तीर्ण

महर्षीचा नागासाई गुंडा सी. ए. फौंडेशन ची परीक्षा उत्तीर्ण

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ५ ऑगस्ट २०२४: कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी स्कूल चा इयता १२ वी कॉमर्स चा विद्यार्थी याने ICAI – इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट ऑफ इंडिया च्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेत नागसाई राममंमोहन गुंडा या विद्यार्थ्याने घवघवीत यश मिळविले आहे. नागसाई याने कुठलेही बाहेरील कोचिंग क्लास केले नाही त्याने केवळ विद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन घेतले होते. केवळ शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सेल्फ स्टडी च्या जोरावर या विद्यार्थ्याने हे यश मिळविले आहे.

जाहिरात

त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे विश्वस्त आणि मठाधीपती प. पु. रमेशगिरी महाराज, अध्यक्ष दत्तात्रय होळकर, उपाध्यक्ष विलास कोते पाटील, सचिव अंबादास अंत्रे, विश्वस्त भाऊ पाटील, रामकृष्ण कोकाटे, अनिल जाधव, , अतुल शिंदे, आशुतोष पानगव्हाणे, बाळासाहेब चव्हाण, शिवनाथ शिंदे, प्राचार्य राजेंद्र पानसरे, प्रशासकीय अधिकारी डॉ श्रीरंग झावरे, उपाप्रचार्य कैलास ढमाले आणि सर्व शिक्षक वृंदानी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. या विदयार्थ्याला कॉमर्स विभागचे शिक्षक कैलास कुलकर्णी, शादमीन सय्यद, अनंत बज यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

जाहिरात

 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे