सावता महाराजांनी कामातच देव पाहिला – परशुराम महाराज अनर्थे; संवत्सरमध्ये सावता माळी महाराज पुण्यतिथी
सावता महाराजांनी कामातच देव पाहिला – परशुराम महाराज अनर्थे; संवत्सरमध्ये सावता माळी महाराज पुण्यतिथी
सावता महाराजांनी कामातच देव पाहिला – परशुराम महाराज अनर्थे; संवत्सरमध्ये सावता माळी महाराज पुण्यतिथी
कोपरगाव विजय कापसे दि ५ ऑगस्ट २०२४ – कोपरगाव तालुक्यातील संवत्सर गावातील योगेश ससाणे यांच्या ससाणेनगर येथे संत सावता महाराज पुण्यतिथी विविध उपक्रमांनी तसेच रामायणाचार्य, भागवताचार्य ह.भ.प.परशुराम अनर्थे महाराज यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
आयोजित केलेल्या प्रवचन प्रसंगी रामायणाचार्य, भागवताचार्य ह.भ.प.परशुराम महाराज अनर्थे बोलताना म्हणाले की, कांदा मुळ्यांची शेती फुलवून खरा भक्ती मार्ग दाखविणारे संत सावता महाराजांचे कार्य महान आहे. त्यांनी जीवनात कर्माला महत्त्व दिले. कामातच त्यांनी देव पाहिला. पंढरपूरला ते गेले नाहीत, मात्र त्यांच्या भक्तीने साक्षात पांडुरंग त्यांना भेटावयास आले. कर्तव्य, कर्म करीत राहणे ही एक प्रकारे ईश्वरी सेवा असल्याचा संदेश त्यांनी दिला.
प्रवचन नंतर ज्ञानामृत श्रवणाचा व महाप्रसादाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घेतला. तसेच अखील भारतीय श्री संत सावता माळी युवक संघ जिल्हाध्यक्ष मुकुंद मामा काळे , योगेश ससाणे व कैलास सोनवणे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट पध्दतीचे व्यवस्थित नियोजन केल्याबद्दल समाज बांधवांनी सत्कार करून आभार व्यक्त केले.
संवत्सर ग्रामपंचायत उपसरपंच विवेक परजणे, मा.सरपंच वाल्मिकराव निकम, सदस्य महेश परजणे, तुषार बारहाते, संचालक ज्ञानेश्वर परजणे, व्हाईस चेअरमन राजेंद्र परजणे, शशिकांत आगवन, नंदकुमार जगताप, फकीरराव बोरनारे, दीनेश बोरनारे, राजेंद्र बोरनारे, मोहन निकम, रामभाऊ कासार,पंचअवतार शेतकरी गट चेअरमन बाळासाहेब काळे,पाटबंधारे अधिकारी सचिन ससाणे साहेब, पत्रकार मनिष जाधव, बाळासाहेब नेवसे, अनिल सोनवणे, कैलास सोनवणे, उध्दव बोरावके, रामदास बोरावके, राजेंद्र आबक, पंडीत भारुड,दीलीप कासार, चंद्रकांत कोद्रे, ह.भ.प.मिराताई वाकचौरे,पावडे बाबा,लक्ष्मण साबळे,प्रभाकर ससाणे,उत्तमराव ससाणे,आप्पासाहेब शेटे,ईजाज शेख, अशोकराव निलख यांच्यासह आदि पदाधिकारी, कार्यकर्ते, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.