आपला जिल्हा
महेश सावंत कोपरगावचे नवे तहसीलदार
महेश सावंत कोपरगावचे नवे तहसीलदार
संदीप कुमार भोसले यांच्या बदली नंतर महेश सावंत कोपरगावचे नवे तहसीलदार
कोपरगाव विजय कापसे दि ८ ऑगस्ट २०२४– कोपरगावचे सध्याचे तहसीलदार संदिपकुमार भोसले यांची मागील आठवड्यात प्रसिध्द साईबाबा देवस्थान शिर्डी येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्त असलेल्या जागेवर तहसीलदार महेश सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाचे सह सचिव अजित देशमुख यांनी बुधवार दि ७ ऑगस्ट रोजी काढलेल्या तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीच्या पदस्थापनेत सध्या नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालायत सामान्य प्रशासन विभागात कार्यरत असलेले तहसीलदार महेश सावंत यांची कोपरगावचे तहसीलदार म्हणून नियुक्ती केली असून सावंत हे लवकरच आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहे.