होय विवेकभैय्या कोल्हे आमदार होणार – काका कोयटे
होय विवेकभैय्या कोल्हे आमदार होणार – काका कोयटे
कोपरगाव विजय कापसे दि ८ ऑगस्ट २०२४–काल राष्ट्रीय हथकरघा दिनाचे औचित्य साधून समता हॉल येथे आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश(काका) कोयटे,संजीवनी स्वयं सहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्ष रेणुकाताई कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी बोलताना काका कोयटे यांनी कोपरगावची बाजारपेठ फुलण्यासाठी व व्यावसायिकांना मदत होण्यासाठी विवेकभैय्या कोल्हे हे आमदार होतील.विधान भवन परिसरात देखील आपल्या स्थानिक कलाकुसरीचे अहींसा केंद्राचे स्टॉल लागून दर्जेदार प्रतिसाद मिळेल. हथकरघा व्यवसायाशी निगडित कलेला न्याय मिळून महिलांना मोठी संधी उपलब्ध होईल आशयाचे विधान केले आहे.यामुळे अनेकांच्या मनात आहे ते काका कोयटे यांनी व्यक्त केल्याने कोपरगाव मतदारसंघात एकच चर्चेला उधाण आले आहे.
होतकरू आणि धाडसी युवा चेहरा म्हणून विवेकभैय्या कोल्हे यांनी जनतेच्या मनात घर केल्याने त्यांच्याकडे एक आश्वासक नेतृत्व म्हणून नागरिक पाहतात.व्यापारी,उद्योजक,राजकीय नेते,शेतकरी,सामाजिक कार्यकर्ते,नागरिक यांनी हेरलेला हा अभ्यासू नेता लवरकच विधानसभेत आपला आवाज बुलंद करेल अशी अपेक्षा सर्वांना असल्याचे यातून अधोरेखित होते. येवल्याची साडी पाच हजाराना आणि आपली दहा हजाराला असे झाले तर खरेदीवर परिणाम होईल त्यामूळे आपल्याला बाजारपेठेची प्रसिध्दी मोठ्या प्रमाणात करावी लागणार आहे.सुदैवाने आपल्याकडून समृध्दी महामार्ग गेला आहे त्याचा फायदा आपण घेऊ शकतो असे कोयटे म्हणाले.
” काका कोयटे यांनी केलेले विधान आणि विवेकभैय्या कोल्हे यांनी आपल्या व्हिजनमद्ये ठेवलेलं स्काय अर्थात शिर्डी,कोपरगाव,येवला हे येणाऱ्या काळात यशस्वी होईल.शिर्डी टुरिझम,कोपरगाव टेक्नॉलॉजी,येवला टेक्सटाइल अर्थात ट्रिपल टी हा या स्कायचे शक्तीकेंद्र असणार आहे.”