समता चॅरिटेबल व सोनतारा भनसाळी ट्रस्टच्या वतीने प्रथमच ‘इन्कम टॅक्स कायदा व बजेट २०२४’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र संपन्न
इन्कम टॅक्स भरणे म्हणजे देश सेवा करणे – सीए डॉ.गिरीश आहुजा
कोपरगाव विजय कापसे दि ९ ऑगस्ट २०२४ : इन्कम टॅक्स हा प्रत्येक व्यवसायातील व्यक्तीला भरावा लागतो. इन्कम टॅक्स विषयी असणारा कायदा हा टॅक्स भरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची सत्यता पडताळून पाहत असतो. सध्या डिजिटल युग असल्यामुळे व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने वास्तविक परिस्थितीचे भान ठेवून योग्य तो नफा तोटा नोंदविला पाहिजे. चुकीच्या पद्धतीने नफा तोटा नोंदविला गेला तर नुकसान आपलेच आहे. चुकीच्या कामामुळे कारवाई होत असते. त्यामुळे स्वतःमध्ये वेळेनुसार बदल केला पाहिजे. इन्कम टॅक्स भरणे म्हणजे देश सेवा करणे आहे. त्यामुळे प्रत्येकाने इन्कम टॅक्स वेळेवर भरावा. असे आवाहन सुप्रसिद्ध व्याख्याते सीए डॉ.गिरीश आहुजा यांनी समता चॅरिटेबल ट्रस्ट आणि सोनतारा भनसाळी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव शहरात प्रथमच ‘इन्कम टॅक्स कायदा व बजेट २०२४’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र ७ ऑगस्ट २०२४ रोजी कृष्णाई बॅन्केट हॉल येथे आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
या चर्चासत्राची सुरुवात व्याख्याते सीए डॉ.गिरीश आहुजा, समता चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, सोनतारा भनसाळी ट्रस्ट अध्यक्ष अरविंद भनसाळी, उपाध्यक्ष संजय भनसाळी, व्याख्यानमाला संयोजक राजकुमार बंब यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. प्रमुख व्याख्याते डॉ.गिरीश आहुजा व मान्यवरांचे स्वागत राजकुमार बंब यांनी केले तर परिचय सीए प्रसाद भंडारी यांनी करून दिला. समता चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष काका कोयटे व सोनतारा भनसाळी ट्रस्ट अध्यक्ष अरविंद भनसाळी यांच्या हस्ते व्याख्याते व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
डॉ.गिरीश आहुजा यांनी इन्कम टॅक्स कायदा व २०२४ च्या बजेट विषयी सर्व सामान्यांना समजेल अशा साध्या, सोप्या व ओघवत्या भाषेत सविस्तर माहिती दिली. तसेच उपस्थितांच्या शंकांचे ही समाधान केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी केले. या एक दिवसीय चर्चासत्राला कोपरगाव तालुक्यातील चार्टर्ड अकाउंटंट, टॅक्स प्रॅक्टिशनर, व्यापारी इंडस्ट्रियलिस्ट, बँकिंग क्षेत्र, मेडिकल असोसिएशन, बिल्डर्स असोसिएशन या विविध विविध क्षेत्रातील व्यक्ती सहभागी झाले होते. अजिंक्य भनसाळी यांनी मानले.